घरमुंबईशिवडीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू ७ जखमी

शिवडीमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू ७ जखमी

Subscribe

अपघातामध्ये ८ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कारमध्ये असलेल्या जोडप्यांचा समावेश आहे. जखमींमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

भरधाव वेगाने माझगावच्या दिशेने निघालेल्या एका अर्टिगा कारने बसथांब्यावर उभे असणाऱ्या प्रवाशांना धडक देत एका उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अर्टिगा कारमधील दोघांसह ७ जण जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी४.३० वाजता शिवडी येथील झकेरिया बंदर येथे झाला. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अर्टिगा कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

दर्शन दीपक पाटील (१८) असे अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वाती पाटील (४०), निधी पाटील (१२), गौरी नांदगावकर (४०), जय नांदगावकर (१३), कल्पेश घारगे (२५), शहाबाज इलियास बादी (२६) आणि शहाबाजची पत्नी हे अपघातात जखमी झाले आहे. माझगाव येथे राहणारा शहाबाज हा रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पत्नीसह अर्टिगा कारमधून माझगाव येथे घरी जाण्यासाठी भरधाव वेगाने निघाला होता. शिवडी येथील झकेरिया बंदर या ठिकाणी एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात शहाबाजचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार बसथांब्यावर बसची वाट बघत उभे असणाऱ्या प्रवाशांना चिरडत पुढे ट्रकवर आढळली.

- Advertisement -

या अपघातात अर्टिगा चालकासह ८ जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तसेच अपघातस्थळी आलेल्या पोलिसांनी जखमींना ताबडतोब केईएम हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी दर्शन पाटील याला तपासून मृत घोषित केले. तर इतर सहा जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अर्टिगा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दर्पण हा आई आणि बहिणीसोबत नातेवाईकाकडे आला होता व घरी परत जाण्यासाठी तिघे बसथांब्यावर बसची वाट बघत उभे होते. तसेच जखमीमध्ये गौरी नांदगावकर आणि जय नांदगावकर हे आई मुलगा असून हे दोघेही बसथांब्यावर बसची वाट बघत होते. अर्टिगा चालक शाहबाझ आणि त्याची पत्नी देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

कल्पेश घारगे

शिवडी येथील कृष्णा इमारत येथे राहणारा कल्पेश घारगे याचा वाढदिवस काही दिवसांपूर्वींच झाला होता, परंतु त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी येता आले नाही म्हणून पाटील आणि नांदगावकर या दोन्ही कुटुंबातील पाचजण रविवारी सकाळीच कल्पेशच्या घरी शिवडी येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही कुटुंब घाटकोपर येथे घरी जाण्यास निघाले होते. कल्पेश त्यांना टॅक्सीत बसून देण्यासाठी आला होता. ,मात्र टॅक्शी मिळत नाही म्हणून हे कल्पेश आणि पाचही जण बसची वाट बघत बसथांब्यावर उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या अर्टिगा या मोटारीने कल्पेश यांच्यासह सहाही जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात १८ वर्षाचा दर्शन पाटील याचा मृत्यू झाला असून कल्पेश हा गंभीरीत्या जखमी असून त्याच्या लिव्हरला गंभीर इजा झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कल्पेशचा मित्र जितेश कदम याने दिली. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -