घरमुंबईया दिवशी कल्याणमध्ये होणार मोफत मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया

या दिवशी कल्याणमध्ये होणार मोफत मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया

Subscribe

कल्याणकरांसाठी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी शिबीर व अल्प दरात तिरळ्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आली आहे.

संकल्प प्रतिष्ठान व ‘भक्तीवेदांत हॉस्पिटल, मिरारोड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी शिबीर व अल्प दरात तिरळ्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया शिबीराचे २७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वा.पर्यंत कल्याण (प.) येथील संकल्प प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. इच्छूकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सचिन कदम, संस्थापक-अध्यक्ष, संकल्प प्रतिष्ठान यांच्याशी ९८२०३१००६६ / ९८१९३२७७३७ या क्रमांकावर संपर्क करावा.

शिबीराची वैशिष्ट्ये

शिबीराची वैशिष्ट्ये तज्ञांकडून नेत्र तपासणी करण्यात येते, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया भक्तिवेदांत रुग्णालयात केली जाते व मोफत लेन्स बसविली जाते व मोफत औषधे दिली जातात, शिबीराच्या ठिकाणावरून रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी नेण्याची आणि शस्त्रक्रियेनंतर परत आणण्याची व्यवस्था मोफत केली जाते याची नोंद घ्यावी, भक्तिवेदांत रुग्णालयातील वास्तव्याच्या काळात मोफत चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था करण्यात येते, सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध केले जातात, रुग्णांची नोंदणी सकाळी ८.३० वाजता शिबीराच्या ठिकाणी केली जाते.

- Advertisement -

विशेष सूचना कृपया येतांना आधार कार्डची झेरॉक्स अवश्य आणावी. तसेच कोणताही जुना आजार असल्यास त्याचे रिर्पोट्स व औषधे सोबत आणावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -