सेल्समनकडून सीसीटीव्ही एजन्सीला कोट्यवधींचा चुना

Mumbai
fraud
फसवणूक

सीसीटीव्ही यंत्रणेचे साहित्य पुरवठा करणार्‍या ठाण्यातील एजन्सीला भाईंदरच्या सेल्समनने कोट्यवधींचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे. गिरीराज उर्फ जिगर जोशी (33 रा.भाईंदर,पश्चिम) असे त्या सेल्समनचे नाव असून याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात सेल्समन जोशीसह ग्राहक व अन्य सहा एजन्सीविरोधात 1 कोटी 37 लाख 323 रुपये रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर मे खुशी इंटरप्रायजेस ही सीसीटीव्ही यंत्रणेसाठी लागणार्‍या साहित्याचा पुरवठा करणारी एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये जोशी हा इसम 28 मे 2019 रोजी सेल्समन म्हणून नोकरीवर रुजू झाला. अवघ्या काही दिवसातच या भामट्याने भाईंदर येथील रॉयलटेक इंटरप्रायजेसच्या उमंग त्रिवेदी याच्याशी संगनमत करून कमिशनच्या मोबदल्यात काही एजन्सीचे लेटर हेड मिळवले. त्याद्वारे खुशी इंटरप्रायजेसच्या व्यवस्थापकांचा विश्वास संपादन करीत लाखो रुपयांचा माल या एजन्सींना दिल्याचे भासवत मालाची परस्पर इतरत्र विक्री केली. जोशी व त्रिवेदी या जोडगोळीने इतर एजन्सीच्या नावे तब्बल 1 कोटी 37 लाख 323 रुपयांचा माल घेऊन खुशी इंटरप्रायजेसला ही रक्कम अदा केली नसल्याने एजन्सीचे व्यवस्थापक जयदीप पाटील यांनी जोशी याला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे देत कामावर जाणे बंद केले. त्यानंतर इंटरप्रायजेसचे पाटील यांनी रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा ठाणे नगर पोलिसात दाखल केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here