घरमुंबईनवी मुंबईवर तिसरा डोळ्याचे लक्ष

नवी मुंबईवर तिसरा डोळ्याचे लक्ष

Subscribe

नवी मुंबई । शहरात लावण्यात आलेली सीसीटीव्ही तसेच आयटी उपकरणे कालबाह्य झाल्याने त्या यंत्रातील सर्व हार्डवेअर बदलून ही यंत्रणा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल 154 कोटींचा प्रस्ताव मंगळवारच्या महासभेत सादर केला. मात्र, या प्रस्तावात पुरेशी माहिती नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या या प्रस्तावावर संशय व्यक्त केला. त्यानंतर त्याबाबत खुलासा केल्यावर हा प्रस्ताव पास करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या कानाकोपर्‍यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात एकूण 530 ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यातील 106 ठिकाणे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सूचनेनुसार निवडण्यात आलेले आहेत. 232 गार्डन, 3 बस डेपो, 36 तलाव 115 चौक व प्रत्येक विभाग कार्यालयावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्याखेरीज प्रवेशद्वारे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर, जास्त वर्दळीच्या ठिकाणी हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

अशी आहे सीसीटीव्ही यंत्रणा
ऐरोली-मुलुंड पुल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, किल्ले गावठाण, बेलपाडा या ठिकाणी बसविली जाणार आहे. सर्व मुख्य चौकात वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच निगराणीसाठी कॅमेरे बसविले जाणार आहेत. यात उच्च क्षमतेचे कॅमेरे – 954, पीटीझेड कॅमेरे – 396, वाहनांची गती देखरेख करता स्पिडिंग कॅमेरे – 80, खाडी व समुद्र किनारे या ठिकाणांवर देखरेखीकरता थर्मल कॅमेरे – 9, पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा -43 ठिकाणी, सार्वजनिक घोषणेकरीता 126 ठिकाणी, डायनॅमिक मेसेजिंग साईनचा वापर -59 ठिकाणी,स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख , व्हिडीओ सर्व्हिलन्स मॅनेजर, कमांड कंट्रोल संगणक प्रणाली, डेटा सेंटर,सर्व्हर डेटा ठेवण्याची क्षमता असलेली यंत्रणा, यांचा समावेश आहे. पाच वर्षाकरता या सर्व सीसीटीव्ही यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठेकेदाराला तब्ब्ल देखभाल दुरुस्तीसाठी 26 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -