या रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची करडी नजर

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील स्थानकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

Mumbai
CCTV to be installed on Central and Harbour line railway stations
रुळाशेजारी बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर एखादा गुन्हा घडल्यास तो सीसीटीव्हीमध्ये कैद होतो. यामुळे गुन्ह्याचा तपास करताना या सीसीटीव्हीतील फुटेज पाहून तपासाला सुरुवात होते. यासाठी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असते. याचाच विचार करुन आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेवर आणखी २१० सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु करण्यात येणार असून येत्या ऑक्टोबर पर्यंत सर्व कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेवर २ हजार ९४१ सीसीटीव्हीची नजर

मध्य रेल्वे स्थानकात एकूण २ हजार ९४१ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये बसवण्यात आलेले २ हजार ९४१ सीसीटीव्हीपैकी ९४१ कॅमेरे हे इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम अंतर्गत आहेत. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या आणि रेल्वे हद्दीतील गुन्हे पाहता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सख्या वाढविण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे.

या स्थानकांवर बसविण्यात येणार सीसीटीव्ही

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटना घडल्यानंतर मध्य रेल्वेने मध्य रेल्वेच्या स्थानकांत अतिरिक्त सीसीटीव्ही बसवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकामध्ये हार्बर मार्गावरील स्थानकाचा देखील समावेश आहे.

हार्बर मार्गावरील स्थानक

वडाळा, किंग्ज सर्कल, शिवडी, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, वाशी, सानपाडा, पनवेल, खांदेश्वर, खारघर, मानसरोवर या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील स्थानक

मध्य रेल्वेच्या कुर्ला, ठाणे आणि कल्याणसह अन्य काही स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

वाचा – कर्जत ते लोणावळा मार्गावर सीसीटीव्हीची नजर