घरमुंबईमुंबई शहरात सीसीटीव्हीची करडी नजर

मुंबई शहरात सीसीटीव्हीची करडी नजर

Subscribe

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहरातील विविध ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास देखील मदत होणार आहे.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आता विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे ‘सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत’ शहरातील ठिकठिकाणी बसविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी शहरात अतिरिक्त ५ हजार ६२५ कॅमेरे बसविण्यास आणि त्यासाठी ३२३ कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई शहरात बसवणार ५ हजार ६२५ सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत, मुंबई शहरामध्ये यापूर्वी १ हजार ५१० ठिकाणी मिळून ४ हजार ७१७ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. प्रकल्पाच्या करारातील तरतुदीनुसार, मुंबई शहरात अतिरिक्त ५ हजार ६२५ कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ३२३ कोटी २३ लाखांचा खर्च होणार आहे. प्रकल्पाच्या करारातील तरतूदी आणि तांत्रिक बाबी विचारात घेऊन उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीने घेतलेल्या निर्णयानुसार एल ॲण्ड टी कंपनीमार्फत हे काम करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पूर्वी लावण्यात आलेले ४ हजार ७१७ कॅमेरे आणि आज मान्यता देण्यात आलेले अतिरिक्त ५ हजार ६२५ कॅमेरे असे दोन्ही मिळून एकूण कॅमेऱ्यांची संख्या १० हजार ३४२ इतकी झाली आहे. त्याच्या एकत्रित १ हजार ३०३ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रकल्प खर्चास देखील सुधारित प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. मुंबई शहर सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पामुळे वाहतुकीचे नियमन करण्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होत, असून अतिरिक्‍त कॅमेऱ्यांमुळे ही क्षमता आणखी विस्तारणार आहे.


वाचा – पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर सीसीटीव्हीची नजर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -