घरमुंबईठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Subscribe

युनियन बँक ऑफ इंडिया संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने क्षेत्रीय कार्यालय उत्तर मुंबईचे क्षेत्र प्रमुख कबीर भट्ट्ाचार्य यांच्या मागदर्शनाखाली ठाण्यातील हिरानंदानी मेंडोस येथे शताब्दी वर्ष मॅरेथॉन 2019 चे आयोजन करण्यात आले होते. हिरानंदानी मेडोस स्कूल येथून सकाळी 7 वाजता या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी युनियन बँकेचे महाप्रबंधक सत्यनारायण पाथुरी, क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे क्षेत्र प्रमुख कबीर भट्टाचार्य, स्थानिक नगरसेवीका जयश्री डेव्हिड, सेंट्रल ऑडिटचे महाप्रबंधक के. पी. आचार्या, बीपीटी महाप्रबंधक कल्याणकुमार, मुंबई दक्षिणचे क्षेत्रप्रमुख राजीव मिश्रा, डीजीएम सीएजी राजीव झा, डीजीएम एमडी सेक्रेटीरियल के. एस. अनंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी युनियन बँकेचे महाप्रबंधक सत्यनारायण पाथुरी यांनी मरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सदिच्छा दिल्या, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वज दाखवल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ही स्पर्धा टिकुजीनीवाडी येथून निळकंठ वुड्सपर्यंत 1.5 किलोमीटर अंतर पार करून पुन्हा काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाऊन येऊन 3 किलोमीटर अंतर पार करीत समाप्त करण्यात आली. या स्पर्धेत युनियन बँकेतील सर्व कर्मचारी, कुटुंबिय तसेच माजी कर्मचारी आणि केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसह इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जवळपास 600 नागरिक आणि विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या उत्साहात धावले.

- Advertisement -

या स्पर्धेत करन वाडकर याने द्वितीय तर राजवीर सिंग याने तृतीय क्रमांकाच पारितोषिक पटकावले तसेच कुमार नावाचा स्पर्धक प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेचा मानकरी ठरला, तर महिलांमधून शोभना सुंदर यांनी विजेतेपद पटकावले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -