घरमुंबईदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत रेल्वे प्रवासाची मुभा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत रेल्वे प्रवासाची मुभा

Subscribe

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात रेल्वेकडून मोठा दिलासा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा करीता १० डिसेंबर पर्यंत उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. फेरपरीक्षेसाठी वैध हॉलतिकीट दाखवून विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करता येणार आहे. याशिवाय शिक्षक-शिक्षकेतरांनाही वैध ओळखपत्रासह लोकल प्रवास करता येईल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शुक्रवारपासून सुरू झालेली आहे. मात्र मुंबई उपनगरात परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे आणि परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याकरिता विद्यार्थी आणि पालकांकडून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. यासबंधीत राज्य सरकारने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मध्य आणि पश्चिम रेल्वेने येत्या १० डिसेंबर पर्यंत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवस करण्याची मुभा देण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थांबरोबर पालकांना सुद्धा प्रवेश देण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -