घरमुंबईकंगनाला Y plus सुरक्षा म्हणजे नेमक काय ?

कंगनाला Y plus सुरक्षा म्हणजे नेमक काय ?

Subscribe

कोणत्या श्रेणीअंतर्गत किती सुरक्षेचा समावेश

अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबईबाबत केलेल्या विधानानंतर आणि मुंबईतल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या गृह विभागाकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. प्रत्येक सुरक्षा व्यवस्थेनिहाय कोणत्या श्रेणीअंतर्गत किती सुरक्षा देण्यात येते. तसेच कोणत्या दर्जाच्या सुरक्षा यंत्रणेचा किती फौजफाटा असतो याबाबतची सविस्तर माहिती.

सुरक्षा व्यवस्थेची श्रेणी

- Advertisement -

भारतात ज्या व्यक्तींना सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा धोका असतो अशा महत्वाच्या व्यक्तींना पोलिसांकडून तसेच स्थानिक सरकारमार्फत सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. एखाद्या व्यक्तीला असणाऱ्या धोक्यानुसार चार श्रेणीअंतर्गत सुरक्षा देण्यात येते. झेड प्लस ही सर्वोच्च पातळीची सुरक्षा व्यवस्था असते. त्यापाठोपाठ झेड, वाय आणि एक्स अशा प्रकारची सुरक्षा त्या व्यक्तीला देण्यात येते.

कोणत्या व्यक्तींना सुरक्षा मिळते ?

सिक्युरीटी ब्लॅंकेट अंतर्गत कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महत्वाचे राजकीय नेते, वरिष्ठ सनदी अधिकारी यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात येते.

- Advertisement -

कोणत्या सुरक्षा यंत्रणांकडून ही सुरक्षा देण्यात येते ?
एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप), एनएसजी (नॅशनल सिक्युरीटी गार्डस), आयटीबीपी (इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलिस), सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स) या एजन्सीमार्फत अतिमहत्वाच्या व्हीव्हीआयपी, व्हीआयपी, हाय प्रोफाईल सेलिब्रिटी आणि खेळाडूंना सुरक्षा देण्यात येते.

श्रेणीनिहाय अशी आहे सुरक्षाव्यवस्था

झेड प्लस सिक्युरीटी

झेड प्लस सिक्युरीटी अंतर्गत एकुण ३६ शस्त्रधारी पोलिसांचा समावेश असतो. एनएसजीमार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येते. त्यामध्ये पंतप्रधानांसारख्या महत्वाच्या व्यक्तीचा समावेश असतो. एकुण १९ एनएसजी टीमच्या सदस्यांकडून ही सेवा देण्यात येते. माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येते.

महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारी झेड सुरक्षा – बुलेट प्रुफ कार, पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन एक्स्कॉर्टच्या गाड्या (प्रत्येकी सहा कॉन्स्टेबल) तसेच अतिरिक्त १० पोलिस कॉन्स्टेबल.

झेड सिक्युरीटी

या सिक्युरीटी कव्हरअंतर्गत २२ शस्त्रधारी पोलिस सुरक्षेसाठी असतात. दिल्ली पोलिस, आयटीबीएफ, सीआरपीएफ यांच्यामार्फत ही सुरक्षा देण्यात येते. तसेच एक एस्कॉर्ट कार या पथकात असते.

वाय सिक्युरीटी

या श्रेणीअंतर्गत ११ शस्त्रधारी पोलिस सुरक्षा रक्षकांचे कवच पुरविण्यात येते. या सुरक्षेअंतर्गत दोन पर्सनल सिक्युरीटी ऑफिसरचा समावेश असतो.

एक्स सिक्युरीटी

सर्वात कमी श्रेणीची अशी सुरक्षा म्हणून एक्स सिक्युरीटीची गणना होते. या सुरक्षेअंतर्गत 2 शस्त्रधारी पोलिसांचा यामध्ये  समावेश असतो. यामध्ये एक सिक्युरीटी पर्सनल ऑफिसरचा समावेश असतो.

महाराष्ट्रात कोणाला झेड प्लस सुरक्षा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार,

झेड सुरक्षा
आदित्य ठाकरे, अजित पवार, अण्णा हजारे,

वाय सुरक्षा
उज्वल निकम

एक्स सुरक्षा
राम नाईक

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -