घरमुंबईपारसी समुदायाची लोकसंख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न

पारसी समुदायाची लोकसंख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न

Subscribe

जियो पारसी योजनेअंतर्गत १७२ पारसी बालकांचा जन्म झाला. तसेच, तब्बल १०० जोडप्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या मुलासाठी तयारी दर्शवली आहे.

पारसी लोकसंख्या झपाट्याने घटत आहे हे सर्वश्रूत आहे. या समाजात प्रत्येक दोन जन्मानंतर ८ मृत्यू होत आहेत आणि आजच्या घडीला भारतात पारसी लोकसंख्या केवळ ५७,००० इतकीच आहे. घटत्या लोकसंख्येच्या या चिंतनीय बाबीकडे लक्ष देत काही वर्षापूर्वी भारत सरकारने पुढाकार घेऊन यासंदर्भात ठोस पावले उचलण्यासाठी पारसी समाजाला प्रोत्साहन दिलं होतं. त्यानुसार, द परझोर फाउंडेशन आणि मॅडिसन बीएमबी यांनी बॉम्बे पारसी पंचायत, टीआयएसएस मुंबई आणि फेडरेशन ऑफ झोरोस्ट्रियन अंजुमन्स ऑफ इंडियासोबत पुन्हा एकदा पुढाकार घेत तीन नवे “जियो पारसी” उपक्रम तयार केले आहेत.

१७२ पारसी बालकांचा जन्म

२०१३ सालापासून जियो पारसीकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. जियो पारसी योजनेअंतर्गत १७२ पारसी बालकांचा जन्म झाला. तसेच, तब्बल १०० जोडप्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या मुलासाठी तयारी दर्शवली आहे. जियो पारसी टीमतर्फे ३ नवीन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले आहे. याविषयी नौहीद सायरूसी यांनी सांगितलं की, ” हा उपक्रम समाजजीवनाच्या प्रत्येक घटकाशी जोडलेला आहे आणि यामुळे भविष्याबाबत आशादायी चित्र आपल्याला दिसते.”

- Advertisement -

प्रत्येक मुलामागे महिना ४००० रुपये

जियो पारसी केअर – पारसी जोडप्यांनी कमीत कमी दोन मुलांना जन्म द्यावा. यासाठी त्यांच्या मनातील प्रश्न दूर करण्यात येतील, यासाठी तीन योजना सादर करण्यात आल्या आहेत. क्रेश अँड चाइल्ड केअर सपोर्ट – ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा जोडप्यांना प्रत्येक मुलामागे महिना ४००० रुपये मूल ८ वर्षांचे होईपर्यंत दिले जातील. सीनियर सिटीझन ऑनरेरियम फॉर चाइल्ड केअर – जे ज्येष्ठ नागरिक समाजातील लहान मुलांची काळजी घेत आहेत, अशांना महिना ३००० रुपये मानधन देण्यात येईल. ही रक्कम प्रत्येक मुलामागे मूल १० वर्षांचे होईपर्यंत दिली जाईल.

ज्येष्ठ नागरिकामागे ४०० रुपये

सपोर्ट टू कपल्स टू एनकरेज एल्डरली डिपेंडण्ट्स हू स्टे विथ देम – ज्या जोडप्याला पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाचा विचार करायचा आहे आणि त्यांच्यावर ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी आहे, अशांना महिन्याला प्रत्येक ज्येष्ठ नागरिकामागे ४०० रुपये देण्यात येतील. आर्थिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.

” समाजाची लोकसंख्या कमी होत आहे आणि त्याबाबत वित्तीय मदत देण्यासाठी भारत सरकारने पाऊल पुढे टाकले आहे. जियो पारसी केअरच्या उद्घाटनासह, जियो पारसी आता तरुणांसाठी समुपदेशन, सल्ला, प्रेरणा आणि वित्तीय मदत तसेच मूल जन्माला आल्यानंतर त्यांच्यासाठी मदत आणि कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत पुरवत आहे.’’ डॉ. शेरनाझ कामा – परझोर फाउंडेशनच्या अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -