घरमुंबईतांत्रिक बिघाडामुळे मध्य आणि हॉर्बर रेल्वे विस्कळीत

तांत्रिक बिघाडामुळे मध्य आणि हॉर्बर रेल्वे विस्कळीत

Subscribe

तांत्रिक बिघाडामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण तर हार्बरच्या शिवडी आणि कॉटनग्रीन रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे मध्य आणि हॉर्बर मार्ग विस्कळीत झाले आहेत. मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याणकडून कर्जत आणि कसाराच्या मार्गाने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर  दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर शिवडी आणि कॉटनग्रीन रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे पनवेलकडून सीएसएमटीकजडे जाणारा मार्ग ठप्प झाला आहे.

- Advertisement -

प्रवाशांना प्रचंड त्रास

पनवेल-सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. सकाळी ९.१५ वाजता पनवेल स्थानकावरुन सुटणाऱ्या गाडीत अवघ्या दोन स्थानकानंतर तांत्रिक बिघाड झाला आहे. शिवडी आणि कॉटनग्रीन रेल्वे स्थानकादरम्यान गाडी थांबली आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या वेळी प्रत्येक प्रवाशाला कार्यालयात किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी जायचे असते. कित्येक प्रवाशांना बऱ्याचदा उशिर होतो. त्यात लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होता. आता देखील प्रवाशांना तशाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


हेही वाचा – बेस्ट भाडे कपातीमुळे मुंबईकर खूश

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -