घरमुंबईविनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 'मध्य रेल्वे'ने केले दीड कोटी वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ‘मध्य रेल्वे’ने केले दीड कोटी वसूल

Subscribe

या मोहिमेअंतर्गत गेल्या पाच महिन्यात ४३ हजार ५१६ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले.

कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विमान सेवा, रेल्वे सेवा ठप्प करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर मध्य रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिला प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवासाची परवानगी दिली होती. तसेच काही लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील सुरू केल्या होत्या. मात्र कोरोनादरम्यान सुरू करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये तिकीट काढून अधिकृतरीत्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह अनेक प्रवासी हे विनातिकीट प्रवास करत असल्याचे मध्य रेल्वेच्या निदर्शनास आले. या फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध घेत मध्य रेल्वेने कारवाई केली आहे.

तब्बल दीड कोटी मध्य रेल्वेने केले वसूल

- Advertisement -

या कारवाईच्या दंडातून तब्बल दीड कोटी रुपये मध्य रेल्वेने वसूल केले आहेत. ही कारवाई उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये या वर्षीच्या जून महिन्यापासून २० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शोध घेत मध्य रेल्वेने विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत गेल्या पाच महिन्यात ४३ हजार ५१६ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. यानंतर मध्य रेल्वेने दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून मध्य रेल्वेने १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून ४ हजार विनातिकीट प्रवासी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ४३ हजार ५१६ जणांपैकी लोकलमध्ये ३९ हजारांहून अधिक लांब पल्ल्यांच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणारे आढळले. लोकलमधील विनातिकीट प्रवाशांकडून १ कोटी १० लाख रुपये दंड तर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील विनातिकीट प्रवाशांकडून ४० लाख रुपये दंड म्हणून जमा करण्यात आले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -