घरCORONA UPDATEमध्य रेल्वेने २० हजार मास्क, तर २ हजार सॅनिटायझरची केली निर्मिती

मध्य रेल्वेने २० हजार मास्क, तर २ हजार सॅनिटायझरची केली निर्मिती

Subscribe

मध्य रेल्वेच्या पाच विभागातून तब्बल २० हजार मास्क आणि २ हजार २८२ लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मास्क बनविणे, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजचे वाटप करणे ही सेवा करण्यासाठी रेल्वे कर्मचारी सरसावले आहेत. आतपर्यंत मध्य रेल्वेच्या पाच विभागातून तब्बल २० हजार मास्क आणि २ हजार २८२ लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली आहे.

कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला आहे. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहे. यामधील कर्मचाऱ्यांना मास्कचा पुरवठा करण्यासाठी महिला तिकीट तपासक स्वतः मास्क शिवत आहेत. स्टेशन मास्तर, रेल्वे पोलीस, सफाई कामगार यांच्याकरता सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजचे वाटप करत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर या पाचही विभागातून १९ हजार ७५० मास्क तयार करण्यात आले आहेत. रात्रीपर्यंत २० हजार होणार आहे. तर २ हजार २८२ लिटर सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, रेल्वेमध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप सुरू केले आहे. तसेच गरजू लोकांना सुद्धा देण्यात येत आहे. या वितरणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाच्या दलातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

मास्क आणि सॅनिटायझरचे उत्पादन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -