घरमुंबईमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सायनजवळ तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सायनजवळ तांत्रिक बिघाड

Subscribe

नेरळ रेल्वे स्थानकावर मालगाडीचे इंजिन बिघडले तर सायन रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नव्या वर्षातही मुंबईकरांचे हाल सुरुच आहे. नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. नेरळ रेल्वे स्थानकावर मालगाडीचे इंजिन बिघडले तर सायन रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत ऑफिसला पोहचता येत नाहीये. नवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीची सुट्टी घेऊन आज सर्व जण ऑफिसला जात असताना मध्य रेल्वेचे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली आहे. नेरळ स्थानकाजवळ इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. सकाळी ७.२४ वाजताची लोकल नेरळ रेल्वे स्थानकावर खोळंबून आहे. तर सायन रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला आहे. दरम्यान कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

जाहिरातीमुळे मध्य रेल्वेला ‘अच्छे दिन’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -