घरमुंबईमध्य रेल्वे विस्कळीत; दादर - परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडे

मध्य रेल्वे विस्कळीत; दादर – परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडे

Subscribe

मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी विस्कळीत झाली होती. दादर – परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले होते. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असल्यामुळे धिम्या मार्गाची वाहूतक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. रुळाच्या दुरुस्तीचे काम करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. हळूहळू वाहतूक पूर्व पदावर येत आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.

मध्य रेल्वेचं रडगाणं सुरुच आहे. कधी ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे, कधी इंजिन बंद पडल्यामुळे तर कधी रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते. याआधी मध्य रेल्वेची वाहतूक २४ जानेवारीला विस्कळीत झाली होती. कुर्ला – सायन स्थानका दरम्यान, रेल्वे रुळाला तडे गेले होते. मुंबईकडे येणारी धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -