Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी BREAKING : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण - पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

BREAKING : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कल्याण – पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

कल्याण - पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण – पटणा एक्स्प्रेसमध्ये इंजिनात बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे जलद मार्गाच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. कल्याण – पटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे एक्स्प्रेस ठाकुर्ली स्थानकाजवळ थांबली आहे. त्यामुळे सर्वच गाड्यांचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. तर कल्याणहून मुंबईला येणारी वाहतूक २० ते ३० मिनिटे उशिराने सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या याठिकाणी रेल्वेचे इंजिन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

- Advertisement -