घरमुंबईलॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची अशीही सेंचुरी...

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची अशीही सेंचुरी…

Subscribe

मध्य रेल्वेने २.५४ लाख वॅगन मधून १३.३९ लक्ष टन मालाची वाहतूक  केली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सर्व मेल एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. अन्न, पेट्रोलियम पदार्थ, वीज निर्मितीसाठी कोळसा, वस्तूंच्या मालगाड्या आणि पार्सल गाड्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सतत काम सुरू आहे. २३ मार्च ते ३० जून या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण २ लाख ५४ हजार वॅगनमधून १३ लाख ३९ हजार टन मालाची वाहतूक केली आहे.

१३ लाख ३९ हजार टन मालाची केली वाहतूक

ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व मालाचे  वितरण वेळेवर सुनिश्चित करण्यासाठी, कोविड १९ साथीच्या आजारात लॉकडाऊन असूनही मध्य रेल्वेने आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.  उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत, मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १०० दिवसांत १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतुक यशस्वीरित्या  केली. वाघिणी भारांच्या बाबतीत ते २ लाख ५४ हजार ३३५  वॅगन माल भरले म्हणजे . २३ मार्च ते ३० जून  या १०० दिवसांत मध्य रेल्वेने ५ हजार ३०६ मालगाड्यांतून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि  स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली.  या कालावधीत दररोज सरासरी २,५४३ वॅगन मालाची वाहतूक केली .एकट्या मध्य रेल्वेने, विना-व्यत्यय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी  १ लाख ३७१  कोळशाच्या वॅगनचा पुरवठा विविध उर्जा प्रकल्पांना केला.  तसेच  ३,४७९   वॅगनमधून   अन्नधान्य आणि साखर;  शेतकर्‍यांच्या हितासाठी ९,९८० वाघिणी खते आणि २,६८९ कांदा;  पेट्रोलियम पदार्थांच्या २५,८२१ वाघिणी ;  लोह आणि स्टीलच्या ५,६२२ वाघिणी;  १५,४६० वाघिणी सिमेंट; ७९,६४३ कंटेनर वाघिणी आणि सुमारे ११,२७० वाघिणी डी-ऑईल केक व इतर वस्तूची वाहतूक केली.

कोरोना योद्धामुळे शक्य

मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे कर्मचारी २४×७ सातत्याने  विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत.  लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत.  ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट्स, लोकोमोटिव्ह्ज, डबे आणि वॅगन्सचे देखभाल करणारे कर्मचारी गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी  पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.  पुरवठा साखळी अखंड ठेवत ते प्रत्यक्ष मैदानावरील  कोरोना योद्धा ठरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -