घरमुंबईआता सीएसएमटी स्थानकावर स्पेशल चार्जिंग स्पॉट!

आता सीएसएमटी स्थानकावर स्पेशल चार्जिंग स्पॉट!

Subscribe

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. अनेकदा घरातून मोबाईलची बॅटरी फुल्ल करुन निघाल्यानंतरही मोबाईलची बॅटरी उतरते. त्यामुळे आपल्याला कुठेतरी थांबून मोबाईलला चार्ज करता येतं का याचा जुगाड करावा लागतो. पण, आता ही अडचण दूर करण्याचा मध्य रेल्वेने प्रयत्न केला आहे. चार्जिंग पॉईंटसोबत आणखी सुविधांचं उद्घाटन सोमवारी रेल्वे बोर्डाचं चेअरमन अश्विनी लोहानी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

 

- Advertisement -

प्लॅटफॉर्म क्र. ८ वर चार्जिंग पॉईंट

मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर मोबाईल चार्जिंगची पॉईंट देण्यात आला आहे. मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरही चार्जिंग पॉईंटची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी दिली आहे. आतापर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही मोबाईल चार्जची सुविधा देण्यात आली आहे. पण, लोकलमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आता या सुविधेचा मुंबईकरांना फायदा होऊ शकतो.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय. काळानुसार बुलेट ट्रेन ही आवश्यक आहे. बुलेट ट्रेन देशासाठी मोठी उपलब्धी असेल. २०२३ पर्यंत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय, रेल्वे मार्ग उडवण्याची कुठली ही धमकी नाही. पण, आमचे आरपीएफ , जीआरपी पोलीस नेहमी सतर्क असतात. सीएसएमटी स्थानकाचं मूळ रूप जसं आहे तसंच त्याचं जतन, संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्लास्टिक बंदीबद्दल आम्हीही राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे काम करू. ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा आढावा घेतला आहे. ही मार्गिका लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आश्विनी लोहानी, रेल्वे बोर्ड चेअरमन

 

- Advertisement -

वन रुपी क्लिनिकसाठी नव्याने टेंडर काढणार

प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेच्या स्थानकांवर वन रुपी क्लिनिक्सची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पण, मध्य रेल्वेने ८ स्थानकांतील वन रुपी क्लिनिक्स बंद करावेत असा अचानक निर्णय दिला. त्यामुळे, प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं वन रुपी क्लिनिक्सचे संचालक डॉ. राहुल घुले यांचं म्हणणं आहे. पण, वन रुपी क्लिनिकसोबत जो करार झाला होता त्यामध्ये नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. याबद्दल लोकांच्या, लोक प्रतिनिधींच्या तक्रारी आल्या होत्या. आता वन रुपी क्लिनिकसाठी नव्याने टेंडर काढण्यात येईल, असं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. शि

रेल्वे ट्रॅकवर जो कचरा येतो, तो प्रवाशांकडून फेकलेला नसतो. ९९ टक्के कचरा हा रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या लोकांकडून टाकला जातो. तो गोळा करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची आहे. तरीही आम्ही हा कचरा नियमितपणे उचलत असतो, असंही लोहानी यांनी स्पष्ट केलं आहे.

हरवलेल्या मुलांसाठी १०९८ हेल्पलाईनचं उद्घाटन

हरवलेल्या मुलांसाठी मध्य रेल्वेकडून खास हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं आहे. १०९८ हा हेल्पलाईन नंबर दिवस-रात्र घरातून पळून आलेल्या आणि हरवलेल्या मुलांसाठी सुरू असणार आहे. या हेल्पलाईन नंबरवर जर एखाद्या मुलासाठी कॉल आला, तर त्या मुलाची ओळख पटवून, चौकशी करुन त्याला घरी किंवा आश्रमात सोडण्यात येणार आहे. हा हेल्पडेस्क लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्थानकांत उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -