Video: लघुशंकेसाठी मोटरमनने थांबवली ट्रेन; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

Mumbai

सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेच्या वाहतूकीमुळे सध्या ‘मरे’ ची चर्चा होत असताना एका अजब प्रकारामुळे ‘मरे’ पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोणताही तांत्रिक बिघाडाशिवाय मोटारमनने चक्क लघुशंका करण्यासाठी लोकल ट्रेन थांबवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उल्हासनगर रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल श्रीराम चौकाच्या उड्डाणपुलाजवळ अचानक काही कारण नसताना थांबली. ही लोकल ट्रेन थांबवून मोटरमनने नैसर्गिक विधी उरकून घेतल्याचा हा व्हिडिओ बुधवारी दुपारी एका स्थानिकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. यावेळी मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर दरम्यान अचानक थांबवून त्याने ट्रेनमधून उतरून रुळावर लघुशंका केली.

यावेळी, कोणताही सिग्नल नसताना किंवा पुढे ट्रेन नसल्याने ही लोकल ट्रेन अचानक काही मिनीटे थांबवली होती. याबाबत प्रवाशांमधून आश्चर्य व्यक्त करत त्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाल करणाऱ्या प्रवाशांनी याची तक्रार नोंदवली नाही. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, रेल्वेने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत हे नैसर्गिक कृत्य असल्याचे म्हणत यावर कारवाईची तरतूद नसल्याचे सांगितले आहे.