घरमुंबईमध्य रेल्वेच्या मोटारमन संघटनेचा संप मागे

मध्य रेल्वेच्या मोटारमन संघटनेचा संप मागे

Subscribe

मध्य रेल्वेच्या मोटारमन संघटनेने संप मागे घेतला आहे रेल्वे प्रशासनासोबत मोटारमन संघटनेची बैठक झाली. या बैठकीमध्ये लेखी आश्वासन दिल्यानंतर मोटारमन संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. आज सकाळपासून मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मोटारमन संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. मोटारमनच्या संपामुळे सकाळपासून मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. रेल्वे प्रशासनासोबत मोटारमन संघटनेची बैठक झाली. या बैठकीतील चर्चे दरम्यान लेखी आश्वासन दिल्यानंतर मोटारमन संघटनेने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप

मध्य रेल्वेवरील मोटारमननी वेगवेगळ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासून जादा तास काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात लाल सिग्नल चुकवल्यास सेवेतून मुक्त करणे, रिक्त पदे भरणे आदी प्रमुख मागण्यांसाठी मोटारमनने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा काही विस्कळीत होत आहे. मध्य रेल्वेवरील आतापर्यंत ९० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. सकाळपासूम मध्य रेल्वे मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होत्या. त्यामुळे आज प्रवाशांचे मोठे हाल झाले.

- Advertisement -

रिक्त जागा भरण्यात याव्या ही प्रमुख मागणी

मध्य रेल्वेवर ६७१ मोटरमन सेवेत आहेत. पण गेल्या काही वर्षांत फेऱ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता मोटारमनवरील कामाचा ताण जास्त आहे. मध्य रेल्वे मोटारमन श्रेणीत सध्या २७१ पदे रिक्त आहे. पदांची भरती करतानाच कारवाईची तीव्रता कमी करण्याची मागणी मोटरमन वर्गातर्फे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे. त्यास नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, रेल्वे कामगार सेनेकडून पाठिंबा मिळाला आहे. या मागण्यांसाठी मोटारमन वर्गाने जादा तास काम न करण्याचा इशारा दिला होता.

लेखी आश्वासनानंतर संप मागे

मोटोरमन संघटना आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये शुक्रवारी दोन वेळा बैठक झाली. आधीच्या बैठकीमध्ये मोटरमन्सनी ओव्हरटाइम काम करण्यास नकार दिला होता त्यामुळे ही बैठक फिस्कटली. त्यानंतर पुन्हा ५ वाजता बैठक झाली. या बैठकी दरम्यान रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर मोटारमन संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -