घरमुंबईलोकसभा निवणुकीसाठी मध्य रेल्वेची तयारी

लोकसभा निवणुकीसाठी मध्य रेल्वेची तयारी

Subscribe

जादा पैशावर ठेवणार नजर

केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे राज्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून अतिरिक्त रेल्वे गाड्या आणि रेल्वेचे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवडणूक काळात रेल्वेमार्फत पैसे घेऊन जाणार्‍यांवर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकलसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण ४ टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नुकतीच राज्यातील निवडणूक आयोगाची राज्यातील महत्वपूर्ण विभागांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोेजनावर आणि सुरक्षेवर महत्वपूर्ण चर्चा झाली. या राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीत मध्य रेल्वे प्रशासनाचे अधिकारी होते. ज्यात मध्य रेल्वे निवडणुकीच्या काळात १० पेक्षा जास्त गाड्या सोडणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मॅन पॉवर आणि सुरक्षेसाठी आरपीएफ पोलिसांची दोन पथकेसुद्धा निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

- Advertisement -

कर्मचारी तसेच सुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात असल्याने लोकसभा २०१९ ची निवडणूक चार टप्प्यात घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होतो. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणावर पैसा घेऊन जाण्यासाठी मुख्यत: रेल्वे गाड्यांचा वापर होतो. त्याला आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वेकडून विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. सोबतच रेल्वेची सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. यासाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांकडून युध्दस्तरावर तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाचा एका सुत्राने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -