घरमुंबईमध्य रेल्वेच्या वाहतूकीचा खोळंबा

मध्य रेल्वेच्या वाहतूकीचा खोळंबा

Subscribe

करीरोड रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेच्या बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक पुर्णतः विस्कळीत

मुंबई-मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. मुंबई दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतूक मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा तांत्रिक बिघाड करीरोड रेल्वे स्थानकाजवळ झाला असून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक पुर्णतः विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना आपले निश्चित रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून भर उन्हात पाय-पीट करावी लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -