Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत असणार मेगाब्लॉक

Related Story

- Advertisement -

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मार्गावर रविवारी 10 जानेवारी 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण अप व डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी – चुनाभट्टी – वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.  मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप व डाउन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.37 ते दुपारी 2.48 दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
तसेच सकाळी 10.26 ते दुपारी 3.19 दरम्यान कल्याण येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि निर्धारित थांब्यांवर थांबतील. तर हार्बर रेल्वे मार्गांवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर चूनाभट्टी/ वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गांवर सकाळी 11.10 ते सांयकाळी 4.50 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

दरम्यान पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 9.56 ते दुपारी 3.20 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणार्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर गोरेगांव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून पनवेल आणि कुर्ला रेल्वे स्थानकांच्या प्लेटफॉर्म क्रमांक 8 वरुन विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हार्बर मार्गांवरील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुख्यमार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची अनुमती असणार आहे.

- Advertisement -