घरताज्या घडामोडीविद्याविहारचा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेचा 'ट्रॅफिक ब्लॉक'

विद्याविहारचा पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेचा ‘ट्रॅफिक ब्लॉक’

Subscribe

मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर तोडण्यासाठी गुरुवारी 'ट्रॅफिक ब्लॉक' घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर तोडण्यासाठी १६ जानेवारीला ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मुलुंड स्थानकावर पाचव्या आणि सहाव्या मार्गांवर डागडुजीची कामे करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऐनवेळी कामावर जाणाऱ्या नोकदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता आहे.

यावेळेत घेण्यात आला ‘ट्रॅफिक ब्लॉक’

मध्य रेल्वेवर १६ जानेवारी, गुरुवारी दुपारी ४.४५ ते रात्री ९.४५ यावेळेत ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून वाहतुकीत काही बदल देखील करण्यात आले आहेत. एलटीटी – हुबळी एक्स्प्रेस रात्री ११.०५ वाजता तर एलटीटी – हावडा एक्स्प्रेस रात्री ९.५० मिनिटांनी सुटणार असून गोरखपूर – एलटीटी एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम – एलटीटी एक्स्प्रेस ठाण्यातपर्यंत चालवण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ब्रिटिशकालीन ग्रॅण्ट रोडच्या फ्रेअर पुलावर हातोडा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -