घरमुंबईमध्य रेल्वे पुन्हा कोलमडली; लोकल ४० ते ४५ उशीराने

मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली; लोकल ४० ते ४५ उशीराने

Subscribe

रेल्वेवाहतूक उशीरा असल्याने रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी आहे. तातडीने रेल्वेप्रशासनाने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरच वाहतूक पूर्व पदावर येईल अशी अशा आहे.

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे कोलमडली आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्यरेल्वेची वाहतूक मंदावल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. खडवली स्थानकाजवळ रूळाला तडे गेल्यामुळे मध्यरेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल ४० ते ४५ मिनीटे उशीराने धावत आहेत. रेल्वेवाहतूक उशीरा असल्याने रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी आहे.
तातडीने रेल्वेप्रशासनाने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरच वाहतूक पूर्व पदावर येईल अशी अशा आहे.

- Advertisement -

बुधवारी ५ जूनला ईदच्या दिवशी डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वे वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे मध्ये रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनीटे उशीराने धावल्या होत्या. त्यामुळे मध्यरेल्वेच्या या रोजच्या त्रासामुळे चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात प्रवाशांचे हाल

पावसा आगोदर मध्यरेल्वेची ही स्थिती आहे तर पावसाळ्यात काय हाल होईल या कल्पनेने प्रवासी त्रस्त आहेत. पण पावसाळ्यात मध्यरेल्वे रखडू नये यासाठी मध्यरेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण 79 पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -