मध्य रेल्वेचे बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स जलद ट्रॅकवर

पुण्याहून बांगलादेशात टाटा मोटर्ससाठी ७५ गाड्यांची वाहतूक केली.

मध्य रेल्वेने टाटाच्या कार बांगलादेशात, महिंद्राची वाहने खडगपूरला, ट्रॅक्टर्स फिरोजपूरला, साखरेची बारामतीहून त्रिपुरा आणि कराडहून तिरुनेलवेलीला वाहतूक केली. याव्यतिरिक्त, नाशवंत भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीसाठी शेतक-यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या किसान रेल, तसेच  मध्य रेल्वेने बाळे (सोलापूर) येथून रोल ऑन रोल ऑफ (रोरो) वाहतुकीचे काम सुरू केले. हा सर्व नवीन व्यवसाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये (Divisions) स्थापित व्यवसाय विकास युनिटच्या सखोल विपणनामुळे शक्य झाला.

 बीडीयू उपक्रम

 मध्य रेल्वेने अलीकडेच क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट स्थापित केले आहेत.  हे व्यवसाय विकास युनिट्स  स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि वैयक्तिक  व्यक्तींकडे नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांची बाजारपेठ आक्रमकपणे तयार करतात आणि त्यांच्या मागण्या एकत्रित करतात.  बिझनेस डेव्हलपमेंट युनिट विविध फ्रेट ॲग्रीगेटर, नवीन ग्राहक, व्यापारी संस्था आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेत आहेत. बीडीयूच्या या उपक्रमांमुळे अनेक नवीन वाहतूक मिळू लागली आणि नव्या व्यवसायासाठी व्यापार आणि उद्योगाशी संबंध सुदृढ झाला.

विविध प्रकारची मालवाहतूक 

मुंबई विभागाने बीडीयूच्या माध्यमातून रसायनी येथून दररोज भारत पेट्रोलियम द्वारा एक रॅक तेलाची वाहतुक,कळंबोली यार्ड ते कालिकतपर्यंत संभाव्य रो-रो सेवा, माल व पार्सल कार्गोसाठी भिवंडी स्थानक विकसित करण्यासाठी तसेच वाशिंद येथून जेएसडब्ल्यू स्टीलचे लोडींग वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पुणे विभागाने चिंचवड गुड्स शेड ते एर्नाकुलम येथे जवळपास ९ वर्षाच्या कालावधीनंतर ऑटोमोबाईल रॅकचे वाहतूक करण्यात आले, पुण्याहून बांगलादेशात टाटा मोटर्ससाठी ७५ गाड्यांची वाहतूक केली, प्रथमच कराडहून तामिळनाडू येथील  तिरुनेलवेली आणि विलुपुरम येथे साखरेची  वाहतूक केली,  बारामती ते त्रिपुरा येथे देखील साखर  नेण्यात आली, भुसावळ विभागाने महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडच्या वाहनांची वाहतूक नाशिकहून कलैकुंडा, खडगपूर येथे केली. ओरिएंट सिमेंटसाठी  गंज बसोदा येथे सिमेंटचा मिनी रॅक पाठविले  तसेच भारतीय अन्न महामंडळासाठी खंडवा येथून औरंगाबाद येथे गव्हाची वाहतूक करण्यात आली. नागपूर विभागाने आपल्या बीडीयूमार्फत बुटीबोरी येथून महिंद्रा व महिंद्राची ऑटोमोबाईल लोडिंग वाढविली, सारणी व  चंद्रपूर येथून फ्लाय-राख लोडिंग, वणी येथील डोलोमाइटचे  लोडिंग, रिलायन्स सिमेंट कंपनी लि. साठी सिमेंट लोडिंगची शक्यता निर्माण केली आहे.  आणि  बेतूल गुड्स शेड  येथे गहूची नवीन वाहतूक  निर्माण झाली आहे. २५ ट्रॅक्टर अजनी गुडशेडमधून फिलौर, फिरोजपूर, पंजाब येथे भारीत करण्यात  आले.  सोलापूर विभागाच्या बीडीयूने बाळे  ते नेलमंगळा (बेंगळुरू) पर्यंत रो-रो वाहतूक सुरू केली, पाकणी येथून पेट्रोलियमची लोडिंग सुरु करीत आहे  आणि  दौंड ते कंठन जंक्शनपर्यंत प्रथमच खताच्या मिनी रॅकची लोडिंग सुरू केली.