घरमुंबईमध्य रेल्वेची ‘सिग्नल’ रखडकथा

मध्य रेल्वेची ‘सिग्नल’ रखडकथा

Subscribe

- गेल्या पाच वर्षांत १५ हजारवेळा बिघाड

मुंबईकरांचे जगणे हेच मुळात घडाळ्यावर असते.ऑफीसमध्ये जाण्याची किंवा येतानाची गडबड ही मुंबईकरांसाठी नवीन नाही.परंतु,मध्य रेल्वेच्या रखडकथेने अनेक वेळा प्रवाशांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेचा प्रवास म्हटला की,नेहमीची रखडकथा आहेच. यात मुख्य कारण म्हणजे मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणेत होणारे वारंवार बिघाड. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाबाबत बोलले जाते. याचेच एक उदाहरण म्हणजे गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वे मार्गवर १५ हजारपेक्षा जास्त वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

आता ही समस्या सोडवायची कशी यासाठी रेल्वेकडून विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात सिग्नल यंत्रणेत एकूण १५ हजार १२९ घटना घडल्या आहेत.२०१४-१५ मध्ये एकूण ३ हजार ७७८ वेळा सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला १० वेळा सिग्नल बिघाड झाला आहे. असे सिग्नल बिघाड रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून आता ही संख्या २०१८-१९ मध्ये २ हजार ५९३ वर येऊन ठेपली आहे.

- Advertisement -

उपाय ‘सीबीटीसी’ सिग्नल यंत्रणेचा

मध्य रेल्वेकडून कोट्यवधी रुपयांची सीबीटीसी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा राबविण्यासाठी तब्बल 5 हजार 928 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. अशी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लावण्यासाठी हालचाली सुद्धा सुरु झाल्या आहेत. सोबतच या सीबीटीसी सिग्नल यंत्रणेमुळे लोकलच्या फेर्‍या वाढणार आहेत.

- Advertisement -

१७७४ लोकल फेर्‍यांवर परिणाम ?

मध्य रेल्वेवर दररोज रोज सुमारे १७७४ लोकल फेर्‍या चालविल्या जातात. ज्यामध्ये मध्य मार्ग – ८५८,हार्बर मार्ग – ६१२, ट्रान्स हार्बर – २६४ आणि बेलापूर-खारकोपर – ४०० असा समावेश आहेत. मात्र रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा या लोकल सेवा फटका बसतो. अनेक गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिरा धावतात. त्यामुळे अनेक लोकल फेर्‍या मध्य रेल्वेला रद्द कराव्या लागतात.

मध्य रेल्वेच्या सतत प्रयत्नांमुळे सिग्नल यंत्रणामध्ये येणार्‍या बिघाडात, गेल्या पाच वर्षात घट झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वेच्या वक्तशीरपणात सुधारणा होत आहे. यात आणखी सुधारणा करण्यासाठी सीबीटीसी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा लावण्यात येणार आहे. -सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

सिग्नल बिघाडाच्या घटना
======================
वर्ष बिघाडांची -संख्या
=====================
२०१४-१५ -३७७८
२०१५-१६ -३२४६
२०१६-१७ -२९०३
२०१७-१८ -२६०९
२०१८-१९ -२५९३
===================
एकूण = १५,१२८
==================

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -