घरमुंबईसहायक आयुक्तपदी चक्रपाणी अल्ले यांची शिफारस

सहायक आयुक्तपदी चक्रपाणी अल्ले यांची शिफारस

Subscribe

नितीन कटेकर हे पदावर रुजू न झाल्याने त्यांच्या नावाचा पुन्हा विचार न करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने चक्रपाणी राजगंगाराम अल्ले यांच्या नावाची शिफारस केली आहे.

मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांची ७ पदे भरण्यासाठी उमेदवारांची निवड झालेल्यांपैकी नितीन कटेकर यांनी महापालिकेकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापालिकेने कटेकर यांच्याऐवजी पुढील पात्र उमेदवाराची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कटेकर यांच्याऐवजी चक्रपाणी राजगंगाराम अल्ले यांची सहायक आयुक्तपदावर नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे. गुणवत्तेच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने चक्रपाणी राजगंगाराम अल्ले यांच्या नावाची शिफारस केली.

पदावर रुजू न झाल्याने कटेकरांच्या नावाचा फेरविचार नाही

सहायक आयुक्तांची रिक्तपदे भरण्यासाठी १० मार्च २०१६ रोजी जाहिरात देऊन उमेदवारांची शिफारस करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवण्यात आलं होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ६ जुलै २०१८ रोजी ७ उमेदवारांची शिफारस केली. या सातही उमेदवारांची सहायक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी महापालिकेच्या ठरावाला मंजुरी मिळाली. त्यानुसार सर्वांची नियुक्ती करण्यात येत असून विमाप्र प्रवर्गाचे नितीन नारायण कटेकर हे महापालिकेत सहायक आयुक्तपदी रुजू झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेने कटेकर यांचा नावाचा विचार करता येणार नाही हे त्यांना कळवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सर्पदंशाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

गुणवत्तेच्या आधारे शिफारस

तसेच या निवड यादीतील विमाप्र प्रवर्गातील पुढील पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात यावी, असे लोकसेवा आयोगाला महापालिकेने कळवले. त्यानुसार आयोगाने चक्रपाणी राजगंगाराम अल्ले यांची सहायक आयुक्त पदावरील नियुक्तीसाठी गुणवत्तेचा आधारे शिफारस केली आहे. त्यानुसार त्यांचा प्रस्ताव आता विधी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. अल्ले हे महापालिकेचे कर्मचारी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -