घरमुंबईकीर्तिकरांसमोर जागा राखण्याचे आव्हान

कीर्तिकरांसमोर जागा राखण्याचे आव्हान

Subscribe

उत्तर पश्चिम मतदारसंघात सध्या आजी माजी शिवसैनिक लढत रंगली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कधीकाळी शिवसेनेमध्ये असलेले संजय निरूपम हे या मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर उभे आहेत. मात्र या आजी माजी शिवसैनिकांमध्ये बाजी कोण मारणार याचे उत्तर जरी २३ मे रोजी मिळणार असले तरी सध्या प्रचारात मात्र हे दोन्ही नेते आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. संजय निरूपम हे सध्या गल्लीबोळात प्रचार करत असून, उत्तर भारतीय तसेच मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तर गजानन किर्तीकर यांची मदार मराठी मतदारांवर आहे. त्यामुळे किर्तीकरांचा प्रचार सध्या मराठी भागांमध्ये जास्त पहायला मिळत आहे.

मुस्लीम मतदारांमध्ये कीर्तिकरांबाबत नाराजी

- Advertisement -

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जोगेश्वरी पूर्व पश्चिम भागात मुस्लीम समाजाची बरीच मते आहेत. मात्र ही सगळीच्या सगळीमते जर काँग्रेसच्या पारड्यात पडली तर ऐनवेळी चित्र बदलू शकते. एवढेच नाही तर या विभागात सध्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून, सध्या विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेनेच्या नगरसेवकांवर मतदारसंघातील नागरिकांची नाराजी आहे. त्यामुळे जर ही नाराजी ऐन मतपेटीमध्ये व्यक्त झाली तर किर्तीकरांच्या अडचणी वाढू शकतात. तर गजानन किर्तीकर यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे या मतदारसंघातून समाजवादी पार्टीने सुभाष पासी यांना उमेदवारी दिल्याने उत्तर भारतीय मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

मनसे काय करणार ?

- Advertisement -

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून अभिनेते महेश मांजरेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यावेळी मनसेला ६६,०८८ इतकी मते मिळाली होती. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे संजय निरुपम यांना मदत करणार नसल्याची भूमिका घेतल्याने मनसैनिक संजय निरुपम यांना मदत करणार नाही. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये अखेर मनोमिलन

एकीकडे शिवसेना-भाजपाचे सर्व आमदार, नगरसेवक एकत्र युतीच्या उमेदवारासाठी कामाला लागले असताना मात्र सुरुवातीला काँग्रेसमध्ये या मतदारसंघात एकी दिसत नव्हती. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये तरी आता काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत आहेत. दिवंगत काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांच्या गटाने देखील आता प्रचारात एन्ट्री घेतली आहे.

अशी आहे यंदा लढत –

गजानन कीर्तीकर (शिवसेना)

संजय निरुपम ( काँग्रेस)

सुभाष पासी ( सपा)

2014 ला अशी होती लढत –

गजानन कीर्तिकर (शिवसेना) – ४,६४,८२०
गुरुदास कामत (काँग्रेस) – २,८१,७९२
महेश मांजरेकर (मनसे) – ६६,०८८
मयंक गांधी (आप) – ५१,८६०

या मतदारसंघांची थोडक्यात माहिती

2014 ला एकूण मतदार – ८ लाख ९७ हजार २४५

महिला मतदार – ३ लाख ९३ हजार ०४३
पुरुष मतदार – ५ लाख ४ हजार २०२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -