Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'सामना'तील गलिच्छ अग्रलेखावर चंद्रकांत पाटील नाराज; लिहिणार रश्मी ठाकरेंना थेट पत्र

‘सामना’तील गलिच्छ अग्रलेखावर चंद्रकांत पाटील नाराज; लिहिणार रश्मी ठाकरेंना थेट पत्र

“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील रश्मी ठाकरेंना लिहिणार पत्र

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले गेले. त्यामुळे मी ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांनी पत्र लिहिणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना सामना वृत्तपत्रात लिहिल्या जाणाऱ्या अग्रलेखात वापरल्या जाणाऱ्या भाषेसंबंधी चंद्रकांत पाटील स्वतःहा मुख्यमंत्र्याच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ते असे म्हणाले की, “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”. यासह “शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादिका आहात.”, असेही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सामनातील अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून निशाणा साधला होता.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासंबंधीही भाष्य केलं. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा आमचा राजकीय मुद्दा नाही, निवडणुकीचाही नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला? ते पहिले हटवा, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी मागणी केली, तुम्ही गोधड्या वाळवत आहात म्हणता तर आता करा नामांतर, असंही ते म्हणाले.


दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी! तापमान पोहोचले १.१ अंश सेल्सिअसवर

- Advertisement -