घरमुंबईचंद्रकांत पाटील भाजपला अधिक मजबूत बनवतील

चंद्रकांत पाटील भाजपला अधिक मजबूत बनवतील

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

नवनियुक्त भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. नवनियुक्त मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने राज्यात प्रचंड विजय मिळवला तसाच विजय आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवायचा आहे. राज्यात गेल्या पावणेपाच वर्षांच्या सत्तेच्या काळात महायुती सरकारने उद्योग, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर नेण्याचे काम केले आहे. या आधीच्या सरकारला पन्नास वर्षात जी कामे करता आला नाहीत, ती या सरकारने केली आहेत. जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी राज्यात पुन्हा सत्ता हवी आहे. पाटील यांनी राज्याचे मंत्री म्हणून समर्थपणे विविध विभागांची जबाबदारी पेलली असून मेहनतीने त्या खात्यांचे काम राज्यात उभे केले. एक कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांचा मूळ पिंड संघटनेचा आहे. सामान्य कार्यकर्त्यांना जोडून घेऊन संघटन उभे करण्यात त्यांची हातोटी आहे. त्यांनी संघटनेच्या कामासाठी राज्यभर प्रचंड प्रवास केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गेली साडेचार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या कारकीर्दीत सरकार व संघटनेने सहयोगाने काम केले आणि संघटनेचा विस्तार झाला.

- Advertisement -

या वेळी चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एकजुटीने विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना व घटकपक्षांच्या महायुतीला विजयी करायचे आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसोबतच महायुतीतील पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठीही तेवढेच प्रयत्न करायचे आहेत, असे म्हणाले, तर मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हा आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण असून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या प्रयत्नाने युतीचा एकतर्फी विजय होईल, असे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -