घरमुंबईथोडा पाऊस, थोडं ऊन; बदललेल्या वातावरणामुळे मुंबईकर हैराण

थोडा पाऊस, थोडं ऊन; बदललेल्या वातावरणामुळे मुंबईकर हैराण

Subscribe

वातावरणारणातील बदलाचा मुंबईकरांच्या तब्येतीवर विपरीत परिणा होत आहे. परिणामी पालिका हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

मार्च ते मे महिन्यांमध्ये कडाक्याचा उकाडा सहन केल्यावर मुंबईत पावसाने आता काही प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे मुंबईकर नागरिक सुखावले. पण, या वातावरण बदलाचा त्रासही मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. सकाळी पडणारा पाऊस दुपारी ऊन आणि पुन्हा संध्याकाळी दाटून येणाऱ्या ढगांमधून कोसळणारा पाऊस या सर्व खेळामध्ये मुंबईकरांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

उघड्यावरचे खाणे टाळा

शिवाय, पावसात सर्वांनाच गरमागरम भजीचा आस्वाद घ्यायला आवडतो. रस्त्यांवरील पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे विकार जसे की गॅस्ट्रो, मळमळ, जुलाब, उलट्यांचा त्रास होतो. सोबतच, सतत ताप येऊन डेंग्यू, स्वाईन फ्लू सारख्या मोठ्या आजारांचाही सामना करावा लागतो.

- Advertisement -

घरगुती उपचारांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं. त्यातून डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे, घरातल्या पाण्यावर झाकण ठेवावं आणि डेंग्यूंच्या डासांची पैदास थांबवावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, जर कोणत्याही प्रकारचा आजार जाणवत असेल तर घरगुती उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.
रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना पावसात भिजल्यामुळे, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जास्त त्रास जाणवतो. खोकला तसेच घसादुखीचा त्रास होतो.

अस्वच्छतेतून पसरते रोगराई

पावसासोबत रोगराई येणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते.

सर्दी, खोकल्याच्या तसंच तापाच्या अनेक तक्रारी घेऊन मुंबईच्या पालिकेच्या हॉस्पिटलसह सरकारी हॉस्पिटलमध्येही रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पाऊस सुरू झाल्यापासून, सरकारी हॉस्पिटल्सपैकी सेंट जॉर्ज या हॉस्पिटलमध्ये दररोज ८० ते ९० रुग्ण ओपीडीत दाखल आहेत. दररोज ओपीडीला २० ते २५ रुग्ण सर्दी, खोकल्याच्या, कफ झाल्याच्या तक्रारी घेऊन दाखल होत आहेत.  – डॉ. मधुकर गायकवाड, जनरल फिजिशियन 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -