घरमुंबईजपानी चलन देण्याच्या नावाने फसवणुक करणार्‍या ठगाला अटक

जपानी चलन देण्याच्या नावाने फसवणुक करणार्‍या ठगाला अटक

Subscribe

दिड लाख रुपये बारमध्ये उडविल्याची कबुली

जपानी चलन देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे दिड लाख रुपयांना गंडा घालणार्‍या ठगाला मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. जयानंद विल्ययम नाडर असे या 40 वर्षीय ठगाचे नाव असून पोलीस कोठडीनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जयानंद हा मूळचा मिरारोडचा रहिवाशी असून सध्या तो विलेपार्ले येथील जुहू चर्च रोड, रोहित सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावरील रुम क्रमांक दहामध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार गेल्या वीस वर्षांपासून इंग्लंड येथे नोकरीस होते, सध्या ते निवृत्त झाले असून ते नेहमीच विदेशात फिरण्यासाठी जातात. 10 जुलैला त्यांनी जपानला जाण्यासाठी तिकिट काढले होते.

त्यासाठी त्यांना जपानी चलनाची (येन) गरज होती. ते इंटरनेटच्या माध्यमातून मनी ट्रान्सफर एजंटची माहिती काढत होते. यावेळी त्यांना एका वेबसाईटवर एक मोबाईल क्रमांक सापडला. तिथे त्यांनी संपर्क साधला असता त्याला समोरील व्यक्तीने जयानंद असलचे तो त्याची अधिक एजंन्सी असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी त्याला दिड लाख रुपयांचे येन चलन देणयाची माणगणी केली होती. त्यानंतर जयानंदला त्यांना बँक ऑफ इंडियाचा एक खाते क्रमांक दिला होता. त्यात त्यांना दिड लाख रुपये एनईएफटीद्वारे जमा केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत जयानंदने त्यांना येन चलन दिले नाही. त्यांनी वारंवार संपर्क साधून त्याचा संपर्क झाला नाही. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयानंद नाडरविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. त्याचा शोध सुरु असतानाच जयानंदला अशाच एक गुन्ह्यांत वर्सोवा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांनी अंधेरीतील लोकल कोर्टात अर्ज करुन त्याचा ताबा घेतला होता. हा ताबा मिळताच त्याला पोलिसांनी फसवणुकच्या गुन्ह्यांत अटक केली. चौकशीत त्याने ही रक्कम बारमध्ये दारु पिण्यासाठी उडविल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, तसेच त्याने अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणुक केली आहे याचा आता पोलीस तपास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -