घरमुंबईविदेशात पंचताराकित हॉटेलसाठी भूखंड मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

विदेशात पंचताराकित हॉटेलसाठी भूखंड मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

Subscribe

विदेशात पंचताराकिंत हॉटेलमध्ये सरकारकडून जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका प्रॉपटी इनव्हेस्टमेंट आणि ब्रोक्रिंगच्या व्यावसायिकाकडून एक कोटी तीस लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. राहुल पुष्कर्णा ऊर्फ बॉबी, कविता पुष्कर्णा, राजकुमार, अतुल जोशी आणि ब्रिजमोहन शर्मा अशी या पाचजणांची नावे आहेत. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे इतर काहींना फसविल्याचे बोलले जाते.

दर्शन प्रफुल्लचंद्र देसाई हे अंधेरीतील डी. एन. नगर, दी क्लबसमोरील रुस्तमजी इलिमेंट अपार्टमेंटमध्ये राहत असून त्यांचा प्रॉपटी इनव्हेस्टमेंट आणि ब्रोक्रिंगचा व्यवसाय आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची अंधेरीतील एका जिममध्ये बॉबीशी ओळख झाली होती. यावेळी त्याने तो बॉलीवूड डायरेक्टर असून काही शॉर्ट फिल्म बनविल्याचे सांगितले. आपले सासरे राजकुमार हे लंडन येथे राहत असून त्यांची झिब्राल्टर देशाच्या पंतप्रधानाशी चांगली ओळख आहे.आपण झिब्राल्टर देशात पंचतांराकित हॉटेलसाठी एक जागा सरकारी कोट्यातून मिळवून देतो, असे आश्वासन बॉबीने देसाई यांना दिले.

- Advertisement -

लंडनला नेले
काही महिन्यानंतर त्याने दर्शन देसाई व त्यांचा भाऊ सुमीत देसाई यांना लंडन येथे नेले आणि तिथे राजकुमार नावाच्या व्यक्तीशी ओळख करुन दिली. यावेळी त्यांना तिथे एक जागा दाखविण्यात आली होती. ही जागा देसाई बंधूंना आवडली. या जागेची किंमत शंभर कोटी रुपये आहे. मात्र त्यांना जागा फक्त वीस कोटी रुपयांमध्ये देतो असे सांगून त्याने त्यांना बँकेतून कर्जही मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सर्व सौदा पक्का होताच त्यांच्यात सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी पाच टक्के एक कोटी आणि वकिलांचे तीस लाख रुपये देण्याचे ठरले होते.

१ कोटी ३० लाख जमा
बॉबीचा प्रस्ताव चांगला असल्याने दर्शन देसाई यांनी बॉबी आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात अनुक्रमे 60 लाख आणि 70 लाख रुपये जमा केले. मात्र नंतर त्याने पुन्हा रजिस्ट्रेशन आणि बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांच्याकडे साठ लाख रुपयांची मागणी केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी त्यांना एक कोटी तीस लाख रुपयांची रक्कम संबंधित कंपनीत जमा झालीच नसल्याचे समजले. त्यानंतर तयांनी झिब्राल्टर सरकारमधील काही व्यक्तींशी फोनवरुन विचारणा केली असता अशी कोणतीही जागा विदेशी व्यक्तींना विकता येत नसल्याचे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देसाई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -