घरCORONA UPDATEचेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

चेंबूरमधील ३ दिवसांच्या बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Subscribe

चेंबूरमधील तीन दिवसाच्या बाळासह आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

चेंबूरमधील तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या बाळासह आईचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. परंतु, या बाळाची आणि आईची पुन्हा दोनदा चाचणी होणार आहे. त्याचाचणीमध्ये जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर मात्र, खासगी लॅबवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे.

नेमके काय घडले?

रुग्णाच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील एका रुग्णालयातील तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही लागण कोणामुळे झाली हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात एक व्यक्ती ऍडमिट होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर त्याला त्या रुग्णालयातून हलवण्यात आले. मात्र, या रुग्णलयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार केले गेले. दरम्यान, या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्येच निर्जंतुकीकरण न करताच एका प्रसूती होणाऱ्या महिलेला त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्या महिलेला सिझेरियनद्वारे बाळ देखील झाले आणि त्या दरम्यानच त्या महिलेस बाळाला कोरोनाची लागण झाली. रुग्णालयाच्या या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून या रुग्णालयातून कोरोनाचा प्रसार झाल्याने तसेच कोरोनाच्या रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली नसल्याने या रुग्णालयाला सील करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसेच पुढील काही दिवस हे रुग्णालय बंदच राहणार आहे. तसेच, कोरोनाची लागण झालेल्या महिलेला आणि तिच्या बाळाला कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा  – रुग्णालयाच्या चुकीमुळे तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना; रुग्णालय केले सील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -