घरमुंबईडोंबिवलीत केमिकलयुक्त आहाराविरुद्ध जागर

डोंबिवलीत केमिकलयुक्त आहाराविरुद्ध जागर

Subscribe

गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर 'वृक्षामृत' वाटप आणि प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे अन्न-धान्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळे जीवघेणे आजार जडले आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कॉस्मिक इकोलॉजिकल ट्रस्ट आणि मैत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अशा केमिकलयुक्त आहारा विरोधात मोहीम सुरु करण्यात येणार आहे. तसेच तातडीचा उपाय म्हणून, घरच्या घरी संपूर्णपणे सैंद्रीय पद्धतीने आरोग्यदायी मायक्रो ग्रीन्स मिळविण्यासाठी ‘वृक्षामृत’ वाटप आणि प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. डोंबिवली येथील मानपाडा रोडवरील राजहंस सोसायटीच्या प्रांगणात सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात, सरकारने रासायनिक खतांवर बंदी घालावी यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात येईल. यानंतर राज्यभरात मायक्रो ग्रीन्स तसेच वृक्षामृत प्रचार आणि प्रसार कार्यक्रम राबविण्यात येईल. याशिवाय उपस्थितांना वृक्षमृताचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक डॉ. उदयकुमार पाध्ये आणि सृष्टी गुजराथी यांनी दिली आहे.

जन जागृती मोहीम

आहारात पालेभाज्या हव्यातच, पण त्या गटाराच्या विषारी पाण्यावर वाढलेल्या नकोत. अलीकडे शेतात रासायनिक खाते आणि कीटकनाशकांचे वापरण्याचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. आधीच श्वासातून आत जाणारी हवा शुद्ध राहिलेली नाही, त्यात आता पोटात जाणारे जेवणही विषारी होऊ लागलेय. अशा परिस्थितीत अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बीपी, डायबेटीस तर आता नॉर्मल वाटू लागलेत. सध्या कार्डिऍक अरेस्ट, कॅन्सरची दहशत आहे. या परिस्थितीला कारणीभूत केमिकलयुक्त आहाराविरोधात या कार्यक्रमातून जागृती मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

वृक्षामृत योजना

सरकारी पातळीवर बंदी येईल तेव्हा येईल, मात्र तातडीची उपाययोजना म्हणून आपण आपल्या आहारातील विषारी केमिकल्स नक्कीच कमी करू शकतो. विषारी सांडपाण्यावर वाढवलेल्या पालेभाज्यांमध्ये पोषण शोधण्यापेक्षा घराच्या घरी मायक्रो ग्रीन्स उगवता येतील. यासाठी शेण, गोमूत्र, गूळ, बेसन तसेच वडाच्या झाडाखालील माती आदींचे मिश्रण असलेले वृक्षामृत वापरले तर केमिकल फ्री उत्पादन करणे सहज शक्य आहे. शिवाय या उपायाने कुंड्यांखाली साचलेल्या पाण्यात वाढणाऱ्या डासांपासूनही मुक्ती मिळेल. उंदरांचा त्रासही कमी होईल. सरकारने ठरवले तर डम्पिंग ग्राउंडवर वाढत चाललेल्या कचऱ्याच्या डोंगराचे सुपीक मातीत रूपांतर करण्याचे सामर्थ्यही या वृक्षामृतात आहे. अशा या बहुगुणी आणि बहुपयोगी वृक्षमृताचा प्रचार तसेच प्रसार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम मोफत असून त्याचा सर्वानी लाभ घ्यावा आणि रसायनमुक्त जीवनशैलीच्या प्रसारात सामील व्हावे, असे आवाहन मैत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी अंकोलेकर- गुजराथी यांनी केले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -