घरमुंबईरासायनिक टँकर उलटल्याने कौटुंबी नदी प्रदुषित

रासायनिक टँकर उलटल्याने कौटुंबी नदी प्रदुषित

Subscribe

विषारी रसायनामुळे मासे मृत

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सोमटा येथील कोटुंबी नदीत रासायनिक द्रवाने भरलेला टँकर उलटल्याने नदीत फेसाचे डोंगर तयार झाले आहेत. विषारी द्रवामुळे नदीतील मासे मृत पावले असून आजूबाजूचे आदिवासी मृत मासे खाण्यासाठी नेत असल्याने विषबाधा होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सोमटा गावाजवळ असलेल्या कोटुंबी या छोट्या नदीत रासायनिक द्रवाने भरलेला टँकर पलटी झाला. टँकरमधील रसायन नदीत पडले. त्यानंतर नदीत सुमारे 15 ते 20 फूट उंच फेसाचे डोंगर तयार झाले आहेत. दुसरीकडे, विषारी रसायन पाण्यात मिसळल्याने नदीतील मासे मृत झाले आहेत. याभागात अनेक आदिवासी पाडे आहेत. याठिकाणचे लोक मृत पावलेले मासे खाण्यासाठी घेऊन जात असल्याने विषबाधा होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मोठाले फेस पाहून हायवेवरून प्रवास करणारे असंख्य प्रवासी फोटो काढताना दिसतात. पण, त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून स्थानिकांना मृत झालेले मासे घेऊन जाण्यापासून कुणीही अटकाव करीत नाहीत. विशेष म्हणजे रविवारी संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांनी कोणतीही कारवाई केलेली नव्हती.

ग्रामीण रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी याठिकाणी फिरकलेले नव्हते. जिल्हा प्रशासनानेही याची दखल घेतलेली नाही. अपघातग्रस्त टँकरची माहिती घेण्यासाठी आलेल्या पोलिसांनीही खबरदारीचे कोणतेच उपाय केलेले नाहीत. त्यामुळे विषारी द्रवामुळे मृत झालेले मासे खाऊन विषबाधा होण्याची गावकरी आजारी पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -