घरमुंबईबाईक रेसर चेतना पंडितची आत्महत्या

बाईक रेसर चेतना पंडितची आत्महत्या

Subscribe

बाईक रेसर चेतना पंडितने आत्महत्या केलीये. मंगळवारी रात्री चेतना तिच्या गोरेगाव येथील रहात्या घरी मृतावस्थेत आढळली. गोरेगाव पूर्व मधील पद्मावती नगरमध्ये ती रहात होती. फॅनला गळफास लावून तिने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. चेतना पंडित २७ वर्षाची होती. बाईक ट्रेनिंग कोच आणि रॉयल इनफिल्डची रोड कॅप्टन म्हणून ती प्रसिध्द होती. आत्महत्येपूर्वी चेतनाने सूसाईड नोट लिहली होती. यामध्ये बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. सध्या दिंडोशी पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

गळफास लावून केली आत्महत्या

चेतना तिच्या आणखी दोन मैत्रिणींसोबत गोरेगावमध्ये राहत होती. मंगळवारी रात्री तिची मैत्रिण घरी आली तेव्हा घराचा दरवाजा आतमधून बंद केलेला होता. बऱ्याच वेळा तिने बेल वाजवून देखील चेतनाने दरवाजा खोलला नाही. चेतनाचा मोबाईल नंबरही बंद होता. त्यानंतर तिने शेजारच्यांना याबद्दल माहिती दिली. एका चावीवाल्याच्या सहाय्याने त्यांनी ड्युप्लिकेट चावी तयार करुन घेतली आणि दरवाजा खोलला. घरामध्ये गेल्यानंतर त्यांना बेडरुममध्ये चेतनाने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. यासंदर्भात त्यांनी दिंडोशी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चेतनाला पंख्यावरुन काढून हॉस्पिटलला घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

ब्रेकअप झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

काही दिवसांपूर्वीच चेतनाचा बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला होता. त्यामुळे चेतना दुखावली गेली होती. ती सतत नैराश्येमध्ये असायची. अशी माहिती तिच्या मैत्रिणींनी पोलिसांना दिली आहे. प्रेमप्रकरणात दुखावल्यामुळेच चेतनाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. तिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहली होती. यामध्ये तिने माझ्या महत्वकांक्षा पूर्ण करता न आल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

चेतना जास्त काळ मुंबईबाहेर रहायची

चेतानासोबत तिची मैत्रिण गेल्या चार महिन्यांपासून राहत होती. चेतना जास्त करुन मुंबईच्या बाहेरच राइडवर असायची. पोलीस या प्रकरणी चेतनाच्या बॉयब्रेंडची देखील चौकशी करणार आहेत. चेतना पंडित मूळची कर्नाटकच्या शिमोगा येथील रहिवासी होती. काही वर्षापासून ती मुंबईमध्ये राहत होती. ती मुंबईमध्ये बाईक रायडिंग कोच म्हणून काम करत होती.

- Advertisement -

अभिनेत्रिंना बाईक राइडची दिली ट्रेनिंग

चेतनाने धूम चित्रपटासाठी कतरिना कैफ, जब तक है जान या चित्रपटासाठी अनुष्का शर्मा, एक विलेन चित्रपटासाठी श्रध्दा कपूर त्याचबरोबर माधुरी दीक्षित यांना बाईक राइडिंगची ट्रेनिंग दिली होती. याअगोदर तिनं ‘डर्ट बाईक रायडर’ म्हणूनही काम केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -