घरमुंबई'जनतेसोबत धन की बात, अदानी, अंबानी सोबत धन की बात'

‘जनतेसोबत धन की बात, अदानी, अंबानी सोबत धन की बात’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पालघरमधील विक्रमगड येथे परिवर्तन यात्रेदरम्यान बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. पालघरमधील विक्रमगड येथे परिवर्तन यात्रेदरम्यान बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकार विरोधात परिवर्तन यात्रेचं रणशिंग फुंकलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी नोटाबंदी राफेल करार, सीबीआयमधील वाद, पाक, चीनशी भारताचे असलेले वाद तसेच अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी, अदानी यांचा आधार घेत थेट सरकारवर टीका केली. शिवाय, इंधन दरवादीवरून देखील यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

पाक, चीन प्रश्नावर पंतप्रधान अपयशी

सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारू असं म्हटलं होतं. पण, प्रत्यक्षात मात्र सरकार पाक आणि चीन प्रश्नी अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकला जातात. त्यांच्या अध्यक्षांच्या घरी खीर कुर्मा खातात आणि इकडे भारतात मात्र आपले जवान शहिद होतात. पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली आणि इकडे पठाणकोटवर हल्ला झाला. मग, याला जबाबदार कोण? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

- Advertisement -

चीनच्या अध्यक्षांशी यमुना किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी झोका घेतात. त्यांना ढोकला खाऊ घालतात. पण, इकडे चीननं डोकलाममध्ये घुसखोरी केली. त्याची कोणतीही कल्पना नरेंद्र मोदींना नव्हती. अनेक बढाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारल्या. पण, एकही गोष्ट त्यांना पूर्ण करता आली नाही.

वाचा – पैसे न मिळाल्यानं काँग्रेसनं राफेल करार रोखला – सीतारमण

नोटाबंदीनं काय साधलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका रात्रीत नोटाबंदी जाहीर केली. दहशतवाद कमी होईल आणि काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्याचा दावा केला गेला. पण, सांगितल्याप्रमाणे काहीच घडलं नाही. उलट काळ्याचा पांढरा पैसा झाला. तर, दहशतवादी कारवाया या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नोटाबंदीचा त्रास झाला तो सामान्यांना. नोटाबंदीनं काय साधलं? उलट रांगेत उभा राहून सामान्य माणूसच मेला अशी टीका यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.

- Advertisement -

राफेलवरून सरकार साधला निशाणा

परिवर्तन यात्रेदरम्यान छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. ५०० कोटीचं विमान १६०० कोटीपर्यंत कसं गेलं? असा सवाल यावेळी भुजबळ यांनी केला आहे. तसेच, ‘आपल्या सोबत मन की बात आणि अदानी – अंबानी सोबत धन की बात’ अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे.

सीबीआयचा फायदा स्वार्थासाठी

सीबीआयमध्ये सध्या सुरू असलेल्या वादावरून देखील छगन भुजबळ यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. राफेल कराराची चौकशी होणार या भीतीपोटी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची बदली केली. त्यांना लक्ष्य केलं गेलं अशी टीका यावेळी छगन भुजबळ यांनी केली.

वाचा – राफेल करारावर पंतप्रधानांनी बोलावं – राहुल गांधी

वाचा – Rafale deal : सत्तेत आल्यानंतर राफेल कराराची चौकशी – राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -