घरमुंबईमुंबईतील CSMT जगातील २रे आश्चर्यकारक रेल्वे स्थानक

मुंबईतील CSMT जगातील २रे आश्चर्यकारक रेल्वे स्थानक

Subscribe

जगातील १० आश्चर्यकारक स्टेशनची यादी 'वंडर्सलिस्ट' या संकेतस्थळाने केली जाहीर

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाने जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. जगातील १० आश्चर्यकारक स्टेशनची यादी ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने देखील जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुंबईत असणारे सीएसटीएम या रेल्वे स्थानकाचा समावेश केला आहे. या जगातील आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांपैकी सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचे ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे.


हेही वाचा- आता सीएसएमटी स्थानकावर उभारले ‘सेल्फ टिकिटींग झोन’

- Advertisement -

या टॉप १० यादीमध्ये लंडनचे सेंट पँक्रास इंटरनॅशनल तिसऱ्या, मॅड्रिडचे अटोचा स्टेशन चौथ्या आणि अँटवर्पमधील अँटवर्प स्टेशन पाचव्या स्थानावर आहे.

हे आहे सीएसटीएम रेल्वे स्थानकाचे वैशिष्ट्ये

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. हे स्टेशन म्हणजे वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून फेड्रीक विल्यम स्टिव्हन्सने हे स्टेशन बांधले आहे. मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्टेशन आहे. या स्टेशनचे नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असे होते. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. भारतातले सर्वात व्यस्त असे हे स्टेशन असून रोज साधारण तीन दशलक्ष प्रवासी प्रवास करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -