खासदार उदयनराजे भोसले कांदा निर्यातबंदीवर नाराज; पियुष गोयल यांना पाठवले पत्र

राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले

भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कांदा निर्यातबंदीवरुन मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पत्रक काढून त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

पत्रक

काय म्हणाले उदयनराजे भोसले

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी ही शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारने या निर्यातबंदीचा निर्यण तात्काळ मागे घ्यावा घेवून, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं मला वाटते. कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

हेही वाचा –

महाराष्ट्रात मराठीच हवी; ठाकरे सरकार ५५ वर्षांपुर्वीचा कायदा बदलणार