घरमुंबईअंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला खंडणी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला खंडणी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई सीबीआय न्यायालयाकडून खंडणीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनसह त्यांच्या तीन साथीदारांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. पनवेलमधील एका बांधकाम व्यावसायिकाला २०१५ साली २६ कोटी रूपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणात ही शिक्षा झाली आहे. छोटा राजनसह सुमित म्हात्रे, लक्ष्मण निकम उर्फ ‘दाद्या’ आणि सुरेश शिंदे यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

वर्ष २०१५ मध्ये नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहारात एजंट असलेल्या परमानंद ठक्करला २ कोटी रूपये कमीशनच्या रूपात द्यायचे ठरले होते. पण या व्यवहारात एजंट असलेल्या ठक्करला आणखी रक्कम हवी होती, ही अतिरिक्त रक्कम वाजेकर यांना मंजुर नव्हती. त्यामुळेच ठक्कर याने छोटा राजन यांना संपर्क साधून बिल्डर असलेल्या वाजेकरांकडून जादा रक्कम वसुल करण्यास सांगितले. आता ठक्कर हादेखील पोलिसांना हवा असलेला आरोपी आहे. छोटा राजनला २०१५ मध्ये बालीतून भारतात आणले गेले. छोटा राजन विरोधात असलेली सगळी प्रकरणे ही सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आली होती. त्यापैकी एक प्रकरण हे पनवेलमध्ये नोंदवण्यात आले. याच प्रकरणात आज सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -