घरमुंबईविधानभवन कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळमध्ये आढळले चिकनचे तुकडे

विधानभवन कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळमध्ये आढळले चिकनचे तुकडे

Subscribe

सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी आरोप केला आहे. त्यांनी मटकीच्या उसळची थाळी मागवली होती या उसळच्या रस्स्यामध्ये चिकनचे तुटकडे आढळले.

विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये वेज थाळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी आरोप केला आहे. त्यांनी मटकीच्या उसळची थाळी मागवली होती या उसळच्या रस्स्यामध्ये चिकनचे तुटकडे आढळले. त्यांनी याबाबत विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार केली आहे. संबंधित कंत्राटदार हे निष्काळजीपणे कॅन्टीन चालवत असल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

मनोज लाखे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये या कॅन्टिनच्या कंत्राटदारांवर सचिवांनी योग्य ती कारवाई करावी अशी केली आहे. या कॅन्टिनमध्ये अधिकारी, नेते, पत्रकार हे नियमितपणे जेवन करत असतात. मात्र वेज थाळीमध्ये चिकने तुकडे आढळल्यामुळे विधानभवन परीसरात चर्चेला उधाण आले आहे.

झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही लाखे यांची मागितली आहे. त्यांना आम्ही त्याऐवजी दुसरे पदार्थ उपवासाचे आणून देतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला जायचे असे सांगून निघून गेले. हे काही जाणून बुजून घडलेले नाही. यापुढे आम्ही काळजी घेऊ – रविंद्र नागे, कॅटिंग पर्यवेक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -