Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या; रेल्वे विभागात खळबळ

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या; रेल्वे विभागात खळबळ

Related Story

- Advertisement -

मध्य रेल्वेवरील विद्या विहार रेल्वे स्थानकाच्या चीफ बुकिंग सुपरवायजरने आपल्याच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेत खळबळ उडाली असून घाटकोपर पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाची सखोल तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीफ बुकिंग सुपरवायजर कैलाश कदम (५५) सकाळी विद्याविहार रेल्वे स्थानकातील ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा कर्तव्यावर असताना त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये चहा मागितला. चहा प्यायल्यानंतर त्यांनी ऑफिसचे दार बंद केले. त्यानंतर बराच वेळ ते बाहेर आले नाहीत. तेव्हा रेल्वे कर्मचार्‍यांनी सकाळी ११ वाजता ऑफिसचं दार ठोठावलं. आतून त्यांच्या आवाज येत नव्हता. दार उघडून आत बघितले तर कदम यांनी वायरचा मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

हा प्रकार समोर आल्यानंतक त्याची माहिती पोलिसांना आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली गेली. तेव्हा घटना स्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कैलाश कदम यांचा मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

- Advertisement -

आतापर्यंत कैलाश कदम यांचे आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही. विद्याविहार रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेचा पूर्ण तपास घाटकोपर पोलीस करत आहेत. कैलाश कदम कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात पत्नी आणि दोन मुलांबरोबर राहत होते. रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कैलास कदम यांनी बँकेकडून लोन घतले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते खूप चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाउल उचलल्याचे समजते आहे. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

- Advertisement -