घरमुंबईजावई मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीकडे लक्ष द्यावे

जावई मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीकडे लक्ष द्यावे

Subscribe

मनसे आमदार राजू पाटील यांचे उद्धव ठाकरे यांना साकडे

‘मला कोणतीही टीका करायची नाही, मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत, डोंबिवली शहराकडे आता त्यांनी लक्ष द्यावे. असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. प्रदूषणाला आणि अस्वच्छतेला जबाबदार असणार्‍या एमआयडीसी, महापालिका अधिकार्‍यांवर कारवाई कारवाई करावी, असे पत्र सुद्धा मुख्यमंत्री यांना दिले आहे. तसेच कारखानदारांना महानगर गॅस सवलतीत द्यावी अशी मागणी केली आहे.

राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी या शहराची ओळख होती. आता ती राहिली नसून हे शहर आता प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. या परिस्थितीला जबाबदार असणार्‍या एमआयडीसी व महापालिका अधिकार्‍यांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला बकाल शहर असे संबोधूनही येथील महापालिका अधिकार्‍यांनी त्या नाराजीच्या वक्तव्यातून कसलाच बोध घेतला नाही, ही या शहरांमधील नागरिकांची शोकांतिका असल्याचे पाटील म्हणाले. एमआयडीसीच्या अस्वच्छता, नाले तुंबणे, कचर्‍याचे ढीग, दर्प याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असूनही यंत्रणा मात्र एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात वर करत आहेत.

त्यामुळेच तर कामासारख्या संस्थाना पुढे येऊन नालेसफाई करावी लागत आहे. या ठिकाणी बहुतांशी भाग उद्योग, निवासी असा आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावत आहेत. तसेच कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ‘जैसे थे’च असून तो दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या सर्व बकालीला आणि प्रदूषणाला येथील दोन्ही यंत्रणांचे अकार्यक्षम अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

त्यासाठी अभियंते, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, महापालिकेचे स्वच्छता अधिकारी आदी सगळ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी असे पत्रात म्हटले आहे. तर मला कोणतीही टीका करायची नाही, मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई आहेत, डोंबिवली शहरावर आता त्यांनी लक्ष द्यावे. असे म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -