घरमुंबईवाईट खाद्यसवयींमुळे मुलांचा शारीरिकसह मानसिक विकास खुटंतो; युनिसेफचा इशारा

वाईट खाद्यसवयींमुळे मुलांचा शारीरिकसह मानसिक विकास खुटंतो; युनिसेफचा इशारा

Subscribe

खाण्यापिण्याच्या वाईट आणि अयोग्य सवयींमुळे मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष युनिसेफच्या चिल्ड्रन, फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

खाण्यापिण्याच्या वाईट आणि अयोग्य सवयींमुळे मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष युनिसेफच्या चिल्ड्रन, फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना योग्य प्रमाणात अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही. तसेच खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे पाच वर्षांखालील तीनपैकी किमान एका मुलामध्ये कुपोषण किंवा स्थूलपणा दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम

काही दशकांपासून विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे सांस्कृतिक आणि सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात झाले आहेत. मात्र, आपण खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम कुपोषण आणि स्थूलपणा यातून दिसून येत आहे. युनिसेफच्या अहवालात २१ व्या शतकातील मुलांमधील सर्व प्रकारच्या कुपोषणाचा सखोल अभ्यास केला गेला. यामध्ये कुपोषणामुळे जगातील १४९ दशलक्ष मुले बुटकी, ५० दशलक्ष मुले कृश, ४० दशलक्ष मुले ही स्थूल आणि दोनपैकी एक मुल व्हिटॅमिन ए किंवा लोहच्या कमतरतेने त्रस्त असल्याचे आढळून आले. तर भारतात पाच वर्षांखालील ३५ टक्के मुले ही खुजी, १७ टक्के ही कृश तर ३३ टक्के मुलांचे वजन कमी आहे. मुलांमधील केवळ ४२ टक्के मुलांना योग्य प्रमाणात भोजन मिळते तर २१ टक्के मुलांना योग्य प्रमाणात वैविध्यपूर्ण आहार दिला जात असल्याचे म्हटले आहे. मुलांना लहान वयातच खाण्यापिण्याच्या वाईट सवयी लागत आहेत. माता, पिता मार्केटिंग आणि जाहिरातींना बळी पडत असून, मुलांना मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ दिले जातात. यामध्ये फास्ट फूड आणि अतिशय गोड पेयांचा समावेश असतो. यामुळे मुलांचे वजन वाढते आणि पौगंडावस्थेत स्थूलपणा वाढू लागतो. शहरी भागातील मुलांमध्ये आरोग्याला घातक असलेल्या खाद्यसवयी आता ग्रामीण भागातील मुलांमध्येही दिसत आहेत.

- Advertisement -

मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी

१. परिवार, मुले आणि तरूणाईला पोषक आहाराची मागणी करण्यासाठी प्रोत्साहीत करणे. त्यांना पोषक आहाराचे शिक्षण देण
२. मुलांसाठी तसेच पौगंडावस्थेतील मुलांसाठी आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण करणे.
३. सुयोग्य आणि सोप्या पध्दतीने समजतील अशा लेबल्सचा उपयोग करून घातक पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालणे.
४. पाणी आणि स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा यामुळे मुलांमधील पोषणाचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते.


हेही वाचा – विद्यार्थ्यांचा नाश्त्यामध्ये , जंक फूडचे प्रमाण वाढतेय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -