घरताज्या घडामोडीकोरोनाच्या संकटातही चीनला आठवला भारताचा हा डॉक्टर

कोरोनाच्या संकटातही चीनला आठवला भारताचा हा डॉक्टर

Subscribe

भारत चीनच्या आदर्श मैत्रीचे ठरले होते प्रतिक

चीनमध्ये कोरोना व्हायरस घातलेल्या थैमानामुळे आतापर्यंत १८०० हून अधिक मृत्यू झाले आहेत. पण आतापर्यंत भारताने विविध माध्यमातून केलेल्या मदतीमुळे चीन सरकारने भारताचे आभार मानले आहेत. आमच्या अतिशय कठीण काळात भारतातील असंख्य मित्रांच्या मदतीचे आम्ही अतिशय ऋणी आहोत. भारतातील डॉ कोटनिस यांनी यापू्र्वी केलेल्या मदतीची यानिमित्ताने आठवण करावीशी वाटते असाही उल्लेख चीनचे राजकीय दुत सन विडोंग यांनी केला आहे. डॉ. द्वारकानाथ कोटनीस यांनी जपानसोबतच्या युद्धात १९४० च्या दशकात जखमी चीनी जवानांवर उपचार केला होता. त्यामुळेच डॉ कोटनीस यांचा पुतळाही चीनमध्ये उभारण्यात आला आहे.

A_statue_of_Dwarkanath_Kotnis
द्वारकानाथ कोटणीस यांचे चीनमधील स्मारक

डॉ कोटनीस यांना भारतातून चीनच्या सैनिकांची वैद्यकीय मदत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी चीन – जपान युद्धात दिलेल्या वैद्यकीय मदतीमुळे भारत – चीनच्या मैत्रिचे एक आदर्श उदाहरण म्हणून कोटणीस ओळखले गेले. दुसऱ्या चीन – जपान युद्धा दरम्यान चीनच्या कम्युनिस्ट जनरल झू यांनी जवाहरलाल नेहरू यांच्याकडे विनंती करत भारतातील डॉक्टर पाठवण्याची विनंती केली होती. त्यामुळे पंडित नेहरू यांनी भारतातील डॉक्टरांना यासाठीच्या योगदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉ कोटणीस यांच्यासह पाच जणांची टीम या दौऱ्यासाठी त्यावेळी गेली होती. डॉक्टरांची इतर टीम ही भारतात परतली. पण डॉ कोटणीस हे तिथेच थांबले. खूप कमी वयात अवघ्या म्हणजे २४ वर्षातच आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर चीनमधील वैद्यकीय संस्थेलाही त्यांचे नाव देण्यात आले. तसेच कोटणीस यांच्या नावे एक पोस्टाचे तिकिटही प्रकाशित करण्यात आले होते.

- Advertisement -

पण ५७ देशात भारताचा उल्लेख नाही
गेल्याच आठवड्यात चीनने मदत करणाऱ्या ५७ देशांची यादी जाहीर केली आहे. पण यादीमध्ये भारताचा उल्लेख मात्र करण्यात आलेला नाही. त्यामध्ये ३३ देशांनी वैद्यकीय मदत केली आहे. तर काही देशांनी पैसे आणि साधनसामुग्रीचा पुरवठा केला आहे. भारतानेही चीनला वैद्यकीय मदत पाठवली आहे. पण बिजिंगला पाठवण्यात मदतीच्या निमित्ताने भारताचा उल्लेख मात्र मदत करणाऱ्या देशांच्या यादीत करण्यात आलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन सरकारचे कौतुक करणारे पत्र काही दिवसांपूर्वी लिहिले आहे. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी कोरोना व्हायरसवरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -