घरमुंबईस्कुल ड्रॉपआऊट ते बिलिअन डॉलर्स कंपनीचा मालक, अंबानींना मागे टाकणारा बॉटल किंग...

स्कुल ड्रॉपआऊट ते बिलिअन डॉलर्स कंपनीचा मालक, अंबानींना मागे टाकणारा बॉटल किंग आहे तरी कोण ?

Subscribe

प्राथमिक शिक्षणा दरम्यानच शाळा सोडलेल्या एका व्यक्तीने चक्क मुकेश अंबानी यांना यंदाच्या आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मागे टाकले आहे. बांधकाम मजुर, बातमीदार ते बिलिअन डॉलर्स कंपनीचा मालक अशा या चीनमधील श्रीमंत व्यक्तीचा प्रवास हा खरच थक्क करणारा असा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांची घसरण ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या सर्वोच्च पदावरून झाली आहे. मुकेश अंबानी यांना मागे टाकणारा आशियातील नवा श्रीमंत व्यक्ती कोण आहे याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. आशियात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नवी ख्याती मिळवलेल्या झोंग शनशन यांची ओळख आहे तरी काय ? कोणत्या कारणामुळे ते ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत याचीच चर्चा आता रंगलेली आहे.

झोंग शनशन आहेत तरी कोण ?

चीनमधील Nongfu Spring या सर्वात मोठ्या बॉटल वॉटर कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांची एकुण संपत्ती ही ७०.९ बिलिअन डॉलर्स इतकी आहे. जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या क्रमवारीत त्यांना ११ व्या स्थानी वर्दी मिळाली आहे. सर्वात जलद अशा पद्धतीने संपत्ती जमवणाऱ्या अशा व्यक्तींपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. झोंग शनशन यांना लोन वोल्फ या नावानेही ओळखले जाते.

- Advertisement -

हॅंगझोऊ येथे जन्मलेल्या झोंग यांनी प्राथमिक शाळेतूनच शिक्षण सोडले. चीनमध्ये त्यावेळी सुरू असलेल्या ग्रेट प्रोलेटरिअन कल्चर या क्रांतीमध्ये त्यांनी सहभाग घेतल्याने हे शिक्षण सुटले. सुरूवातीच्या काळात बांधकाम मजुर, एका वृत्तपत्रासाठीचे वार्ताहर, औषध निर्माता म्हणून काम केले. त्यानंतर एप्रिल २०२० मध्ये त्यांनी बिजिंगमधील वॅन्टाई बायोलॉजिकल फार्मसीचा ताबा मिळवला. त्यांनी कंपनीची सुत्रे स्विकारल्यानंतर कंपनीची वाढ ही २० बिलिअन डॉलर्स इतकी झाली. त्यानंतर Nongfu Spring च्या शेअरमध्ये सप्टेंबरमध्ये वाढ होतानाच हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंजमध्ये या कंपनीची नोंद झाली. या कंपनीची वाढदेखील १५५ टक्के इतकी झाली. Nongfu Spring या कंपनीच्या लाल रंगाचे झाकण असलेल्या बॉटल्स या संपुर्ण चीनमध्ये छोट्या दुकानापासून ते मोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्येही विकल्या जातात. ही कंपनी पाण्यासोबतच चहा, ज्यूस आणि फ्लेव्हर्ड व्हिटॅमिन ड्रिंक्सदेखील विक्री करते. औषध निर्मितीमधील कंपनी तसेच पाण्याच्या बॉटल तयार करणारी कंपनी या दोन कंपन्यांमधूनच त्यांची प्रामुख्याने संपत्तीत वाढ झाली. या कंपनीने दोन विद्यापिठांसोबत कोरोनाची लस निर्मितीतही पुढाकार घेतला होता. मुकेश अंबानी जे चौथ्या क्रमांकावर होते, त्यांची घसरण ही आता बाराव्या स्थानावर झाली आहे. अंबानी यांची सध्याची संपत्ती ही ७६.९ बिलिअन डॉलर्स इतकी आहे. याआधी त्यांची मालमत्ता ९० बिलिअन डॉलर्स इतकी होती. त्यामध्ये घट होत आता ही संपत्ती ७६.९ बिलिअन डॉलर्सवर आलेली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -