घरमुंबईक्रिस गेलचा दंगा पाहून पोलिसांना पाचारण

क्रिस गेलचा दंगा पाहून पोलिसांना पाचारण

Subscribe

क्रिकेटस्टार क्रिस गेल याला मुंबईत बुधवारी रात्री एक क्लबमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावून केलेला नाचाचा दंगा महागात पडला आहे. त्याच्या गाणाच्या आवाजामुळे पोलिसांना बोलावण्यात आले.

कॅरेबियन क्रिकेटस्टार क्रिस गेल याला मुंबईत बुधवारी रात्री एक क्लबमध्ये मोठ्या आवाजात संगीत लावून केलेला नाचाचा दंगा महागात पडला आहे. क्रिस मुंबईत सध्या एक जाहिरातीच्या शूटींगसाठी आला आहे. बुधवारी रात्री उशिरा तो एक बारमध्ये मोठ्याने गाणी लावून डान्स करत होता. त्यावेळी या आवाजाने त्रासलेल्या आसपासच्या नागरिकांनी फोन करून पोलीसांना पाचारण केले. पोलीस तातडीने घटनास्थळी तातडीने आले.

 

View this post on Instagram

 

GreatFull – ThankFull – I Love India!! ?? #MumbaiMerijaan #OfficerGayle ?

A post shared by KingGayle ? (@chrisgayle333) on

- Advertisement -

भारतीय कायद्याचा सन्मान करतो

पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना क्रिस गेलला तिथून बाहेर पडण्यास सांगितले. तसेच त्याला पोलिसांच्या गाडीतून हॉटेलपर्यंत पोहोचवले. या प्रकरणी मोठ्या आवाजात गाणी लावल्याबद्दल बार मालकाला दंड ठोठावण्यात आला. क्रिसने यावेळी पोलीस गाडीवर बसून फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर देताना, भारतीय कायद्याचा सन्मान करतो, असे त्यावर लिहिले. कायदा नेहमीच विजयी असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -