बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हर उद्यापासून वाहतुकीस खुला

पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चुनाभट्टी ते बीकेसी हा उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Mumbai
chunabhatti bkc flyover bridge in mumbai to be open for transportation
बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हर उद्यापासून वाहतुकीस खुला

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते चुनाभट्टी दरम्यानच्या फ्लायओव्हरचे लोकार्पण शनिवार ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोणत्याही कार्यक्रमाशिवाय आणि औपचारिक कार्यक्रमाशिवाय हे लोकार्पण होणार आहे. शनिवार सकाळपासूनच हा फ्लायओव्हर जनतेसाठी खुला होणार आहे. त्यामुळे या फ्लायओव्हरमुळे मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होण्यासाठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे प्रवक्ते दिलीप कवठकर यांनी दिली आहे.

आता होणार वेळेची बचत होणार

ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी दरम्यान, जलद कनेक्टिव्हिटीसाठी हा कनेक्टर प्रवाशांचा वेळ वाचवणार आहे. चार पदरी विस्तार असलेल्या या कनेक्टरमुळे सुमारे ३० मिनिटे इतका वेळ वाचवणे वाहन चालकांसाठी शक्य होईल. तसेच या फ्लायओव्हरची लांबी १.६ किलोमीटर तर १७ मीटर रूंदीचा हा फ्लायओव्हर आहे. बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हरशी संबंधित काही कामे शिल्लक होती. त्यामुळे या फ्लायओव्हरचे लोकार्पण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रखडले होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आंदोलन केल्यानंतर मात्र, या फ्लायओव्हरच्या कामाच्या पुर्ततेला वेग आला होता. त्यांनंतर लिखित स्वरूपात, असे आश्वासन एमएमआरडीकडून देण्यात आले होते.

फ्लायओव्हरचे काम पूर्ण होण्यास ४ वर्षांचा कालावधी

बीकेसी चुनाभट्टी फ्लायओव्हरचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल ४ वर्षांचा कालावधी लागला आहे. फ्लायओव्हरच्या औपचारिक उद्घाटनासाठीचा नव्या सरकारच्या स्थापनेच्या मुहुर्तासाठी वाट पाहिली जात आहे हे लक्षात येताच याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवाब मलिक यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले. केंद्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या फ्लायओव्हरच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र, महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता या कार्यक्रमाला कोणतेही राजकीय वळण लागता कामा नये, असा सावध पवित्रा एमएमआरडीएने घेतला आहे. कोणत्याच औपचारिक कार्यक्रमाशिवाय हे उद्घाटन होणार आहे.


हेही वाचा – कामा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन पूर्ववत


 

एक प्रतिक्रिया

  1. अजून नाही झाला चालू पहिल विचारा कधी चालू होईल मग बातमी दया

Comments are closed.